हळद संशोधन केंद्राची बोधचिन्ह स्पर्धा, पहिले बक्षीस एक लाख रुपये

 0
हळद संशोधन केंद्राची बोधचिन्ह स्पर्धा, पहिले बक्षीस एक लाख रुपये

हळद संशोधन केंद्राची बोधचिन्ह स्पर्धा

 देशभरातील कल्पकांना संधी, पहिले बक्षीस एक लाख रूपये 

स्पर्धेत सहभागासाठी 10 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, आमदार हेमंत पाटील यांचे स्पर्धेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन

हिंगोली, दि. 29 (डि-24 न्यूज) : हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या बोधचिन्ह स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे. निवड झालेल्या उत्कृष्ट बोधचिन्हास एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे किंवा ई-मेलवर आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी hbthratc@gmail.com या ई-मेलवर तसेच 9284774867, 9168912891 आणि 9518540058 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे हरिद्रा केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. 

बोधचिन्ह स्पर्धा महाराष्ट्रासह देशभरातील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि हौशी डिझायनर्ससाठी खुली आहे. संस्थेचे कार्य, उद्दिष्टे आणि हळद पिकाशी संबंधित संकल्पना साकार करणारे आकर्षक व अर्थपूर्ण बोधचिन्ह तयार करून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये व प्रशस्तीपत्र, तर तीन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी 11 हजार रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. बोधचिन्ह पूर्णपणे मूळ स्वरूपाचे असावे. त्यावर कोणत्याही प्रकारचा कॉपीराइटचा दावा नसावा. लोगोची संकल्पना, डिझाइनमागील विचार व त्याचा अर्थ स्पष्ट करणारी संकल्पना टिपण (Description/Concept Note) सादर करणेही आवश्यक आहे.

स्पर्धकांनी उच्च दर्जाच्या पीडीएफ स्वरूपात आपले डिझाइन अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे सादर करावे. निवड झालेल्या बोधचिन्हाचे सर्व कॉपीराइट व वापर अधिकार संस्थेकडे राहतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असेही श्री. कच्छवे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow