उद्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा...

 0
उद्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा...

उद्या पासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा...

"दगाबाज रे" संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी साधणार संवाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 5 नोव्हेंबर रोजी मराठवाडा दौर्‍यावर येणार असून "दगाबाज रे" संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी साधणार संवाद आहे. 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी असे 4 दिवस ते मराठवाडयातील शेतकर्‍यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

असा असणार दौरा...

5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथील, सकाळी 11.30 वाजता बीड जिल्ह्यातील पाली येथील, दुपारी 2 वाजता धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथ्रुड, दुपारी 3.30 वाजता धाराशिव जिल्ह्यातील शिरसाव, सायंकाळी 5 वाजता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा, सकाळी 11.30 वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसणी येथील, दुपारी 1.30 वाजता अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी सायंकाळी 4 वाजता नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पार्डी, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी, सकाळी 11.30 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, दुपारी 2 वाजता हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळाबाजार तर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, सकाळी 11.30 वाजता परभणी जिल्ह्यातील सेलु ढेगळी पिंपळगाव दुपारी 2 वाजता जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा व घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील शेतकऱ्यांशी ठाकरे संवाद साधणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow