दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा, प्रचारात दिले झोकून...

 0
दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा, प्रचारात दिले झोकून...

दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा...

पैठण, दि.3(डि-24 न्यूज) -

56-बीडकीन जिल्हा परिषद गटातील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार काकासाहेब बाबासाहेब टेके यांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, जनतेच्या सेवेत सतत असल्याने मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे. हा गट एससीसाठी राखिव झाला नसल्याने इच्छुक असताना निवडणूक न लढता पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांनी आपल्या समर्थकांसोबत बैठक घेऊन काकासाहेब टेके यांना पाठिंबा जाहीर करुन प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी टेके यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचारात झोकून दिले. टेके हे सामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याने मतदार संघातील समस्यांची जाण आहे ग्राऊंडवर त्यांचे काम आहे तर ते नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांच्या सुख दु:खात उभे असतात. खासदार संदीपान भुमरे, पैठणचे युवा आमदार विलासबापू भुमरे यांचे विश्वासू असल्याने गटाचा सर्वांगिण विकासाचा संकल्प केल्याने मतदारांनी 7 फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण निशाणीवर मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन दळवी यांनी केले आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी विजयाचा गुलाल शिवसैनिक उधळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow