शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

 0
शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ...

छत्रपती संभाजीनगर विभागाची विजयी सुरुवात...

क्रीडा व युवक सेवा संचालनालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (17/19 वर्षे मुले/मुली) गटाच्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी(फेन्सिंग) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी उपसंचालक शेखर पाटील, क्रीडा विभाग प्रमुख विजय पाटील , महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे,प्रकाश कटुळे राजू शिंदे दुधाने डॉ. दिनेश वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बाल्लया, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे, महानगरपालिका क्रीडा समन्वयक सागर मगरे, स्पर्धा प्रमुख मार्गदर्शक तुषार आहेर, शिल्पा नेने आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेसाठी राज्यातून 8 विभागातील 500 खेळाडू , प्रशिक्षक, व्यवस्थापक, तांत्रिक समिती,अधिकारी, पंच ,स्वयंसेवक, खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धा दिनांक 3 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय क्रीडा संकुलात

 आयोजित करण्यात आले आहे. 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांमध्ये तलवारबाजीच्या विविध प्रकारांत चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

    तलवारबाजी सारख्या ऑलिम्पिक खेळाला प्रोत्साहन देणे, ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, राज्यभरातील उदयोन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेच्या आयोजनामुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

        आज झालेल्या सामन्यांसाठी राहुल पडवळ,जयदीप पांढरे, विशाल दानवे,सौरभ तोमर,पेरिया स्वामी, महेश कोरडे, विश्वजीत कुलकर्णी 

यांनी पंच म्हणून काम पाहिले.

आज झालेल्या टीम इव्हेंट सामन्यांचे निकाल...

19 वर्षे मुले

फॉइल

1.छत्रपती संभाजीनगर

2.अमरावती 

3.नागपूर 

4.लातूर 

इप्पी

1.लातूर 

2.पुणे 

3.कोल्हापूर 

4.छत्रपती संभाजीनगर 

सेबर

1.नागपूर 

2.छत्रपती संभाजीनगर

3.कोल्हापूर

4.पुणे 

19 वर्षे मुली

फॉइल

1.छत्रपती संभाजीनगर

2.पुणे

3.नागपूर 

4.नाशिक

*इप्पी*

1.नागपूर 

2.कोल्हापूर 

3.मुंबई 

4.पुणे 

*सेबर* 

1.पुणे 

2.छत्रपती संभाजीनगर

3.नाशिक

4.नागपूर

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow