अवैध कुंटनखाना चालवणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेची कारवाई, पाच पिडीत महीलांची सुटका
अवैध कुंटणखाना चालविणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेची कारवाई; पाच पीडित महिलांची सुटका, पाच आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 21 (डी-24 न्यूज) : शहरात अवैध कुंटणखाना चालविणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 56 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल, रोकड, मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे.
दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल निसर्ग, धुळे-सोलापूर महामार्ग, करोडी शिवार, छत्रपती संभाजीनगर येथे अवैधरीत्या कुंटणखाना चालविला जात आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला.
यावेळी आरोपी स्थानिक व विदेशी महिलांना आमिष दाखवून शौकिन ग्राहकांकडून पैसे घेत होते. तसेच कुंटणखाना चालविण्यात महिलांना सहभागी करून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच पीडित महिलांची सुटका केली आणि पाच आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :
आदित्य सुनीलकुमार पांडे (रा. ग्रामप्रसादर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) – मॅनेजर.
रवी काशिनाथ पाटील (रा. कल्याण पश्चिम, जि. ठाणे).
संजय बन्सी जाधव (रा. हिरापूर, ता. गेवराई, जि. बीड).
कमलेश भालेराव (रा. तीसगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) – लॉज चालक.
देविदास मुन्सी राठोड (रा. हत्तीकांतांडा, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) – लॉज मॅनेजर.
जप्त केलेला मुद्देमाल :
पोलिसांनी या कारवाईत एकूण 56 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्याचा समावेश आहे.
गुन्ह्याची नोंद :
या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 329/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 3, 4, 5 तसेच अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलम 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी :
या कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मनकुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच पोलीस कर्मचारी मनोज अकोले, विलास कोतकर, विठ्ठल मानकापे, पोलीस अंमलदार शैलेश आस्कर, वाडीलाल जाधव, दिनेश कुमार राठोड, विशाल सोनवणे, मनोहर गिते, पूजा भोसले, पूजा इंगळे आणि वैष्णवी जटाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे अवैध देहव्यापार चालविणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.
What's Your Reaction?