वैजापूर प्रकरणात मुख्य आरोपींसह 16 आरोपी जेरबंद
वैजापूर प्रकरणात मुख्य आरोपीसह, 16 आरोपी जेरबंद …
वैजापूर, दि.9(डि-24 न्यूज)
रोहित पठारे हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत वैजापूर पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 701/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 109(1), 140(1), 333, 189, 190, 118(1), 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s) व 3(2)(v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वैजापुर शहरात गणेशोत्सव -2026 विसर्जन मिरवणूकी दरम्यान दोन मंडळात झालेल्या वादाचे पुनर्वसन हे हाणामारीत होऊन त्यामध्ये रोहित पठारे यांना झालेल्या मारहाणी नंतर उपचारा दरम्यान यांचा दिनांक 3/11/2026 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलीस ठाण्याची 5 पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती. या पथकांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आंतरजिल्ह्यात लपून बसलेल्या आरोपींचा माग काढला.
या तपासादरम्यान वैजापूर पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यातील फरार असलेल्या आणखी 06 जणांना दिनांक 9/11/26 रोजी अटक केली आहे. त्यामध्ये अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड , ज्ञानेश्वर सिताराम वडाळकर, प्रतीक कैलास साळुंके, रोहित मच्छिंद्र आहेर, संकेत आदिनाथ आहेर, तुषार आदिनाथ आहेर (सर्व रा. वैजापूर) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
यापूर्वी या खून प्रकरणात 8 आरोपींना, तर वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 698/2026 मध्ये 2 आरोपींना असे एकुण 10 आरोपीतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने 06 आरोपींना अटक केल्याने या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. याशिवाय एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
सदरची कारवाई ही प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, अपराजिता अग्नीहोत्री, चार्ज अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापुर, श्री विनय सोनवणे, परि. पोलीस उप अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे. वैजापुर, श्री. विजयसिंग राजपुत, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा श्री. सत्यजित ताईतवाले, पो.नि. श्री. वैभव रणखांब, सपोनि. श्री. विठ्ठल झांजुर्णे स.पो.नि. पो.उप.नि. लहुजी घोडे, भारत निकाळजे रामेश्वर ढाकणे, युवराज पाडळे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
What's Your Reaction?