वक्फ संस्था नोंदणीसाठी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन...
वक्फ सदस्य एड.एस. आय.हाश्मी यांच्या कडून तीन दिवसीय मोफत नोंदणी शिबिर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- केंद्रीय वक्फ कायदा-2025 अन्वये उमीद पोर्टल वर देशातील नोंदणीकृत वक्फ संस्था, तसेच नवीन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने संबंधितांना सवलत व्हावी म्हणून राज्य वक्फ मंडळाचे वरिष्ठ सदस्य ऍड.इफतेखार हाश्मी यांच्या कडून तीन दिवसीय मोफत नोंदणीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या 7,8 व 9 नोव्हेम्बर रोजी पोर्टलवर मोफत नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात संस्थांचे मुतवल्ली, अध्यक्ष व संबंधितांनी मोठ्या संख्येने येऊन फायदा घ्यावा असे आवाहन ऍड.इफतेखार हाश्मी यांनी केले आहे.
सदर शिबिर मोफत असणार असून उमीद पोर्टल वर वक्फचे सक्षम कर्मचारी ही यात सहभागी होऊन नोंदणी साठी मदत करणार आहेत. शिबिर येत्या शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत चालणार आहे. शिबिर ऍड.इफतेखार हाश्मी यांचे कार्यालय, एसटी कॉलनी, फाजलपुरा, साबीर फंक्शन हॉल समोर घेण्यात येणार आहे. औरंगाबादेतील ज्या कोणी संस्था चालकांनी अजून ही पोर्टलवर नोंदणी केली नसेल त्यांनी संस्थाचे अधिकृत कागदपत्रांसह उपस्थित रहावे. केंद्रीय वक्फ पोर्टल उमीद वर नोंदणी साठी 5 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. ऍड.हाश्मी यांच्या वतीने इतर जिल्ह्यातील संस्था नोंदणी कार्यक्रम येत्या काही दिवसात घेण्यात येईल. तत्पूर्वी पोर्टल वर नोंदणी करणे गरजे असल्याचे ही ऍड इफतेखार हाश्मी यांनी सांगितले.
What's Your Reaction?