सिध्दार्थ महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा...

 0
सिध्दार्थ महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा...

सिद्धार्थ महाविद्यालयात जागतिक एडस दिन उत्साहात संपन्न... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, सानिका कॉलेज ऑफ नर्सिंग, पडेगाव येथे जागतिक एड्स दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून रमाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. चारुलता मगरे ह्या उपस्थित होत्या. तर प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर वानखडे म्हणाले , एडस हा एक असा आजार आहे जो एचआयव्ही या विषाणूमुळे होतो. हा विषाणू आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. ज्यामुळे सामान्य आजारांचाही सामना करणे कठीण होते. 

एडसची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये केली होती. एचआयव्हीचा संसर्ग ही एक जागतिक आरोग्य समस्या आहे. 

एडस हा रोग असुरक्षित लैंगिक संबंध तसेच इतर व्यक्तींसोबत सुई किंवा सिरींज शेअर करणे तसेच गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला होऊ शकतो. तसेच सलूनमध्ये कटिंग करताना किंवा दाढी करताना ब्लेड चेंज करणे आवश्यक असते. त्यामुळे सुद्धा एडस हा रोग वाढू शकतो. 

महत्त्वाचे म्हणजे एडस झालेल्या व्यक्तींना सहानुभूती दाखवा आणि त्यांना समजण्याच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करा त्यांच्याबद्दल कोणताही भेदभाव करू नका असे जे म्हणाले याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शीलवंत गोपनारायण प्रा.सुकेशनी जाधव , प्रा. रेणुका जाधव, प्रा.योगिता मोरे ,प्रा.अंजली श्रॉफ, प्रा. वैशाली जगताप, प्रा .पुजा गिरी, देवा रत्नपारखे ,असित शेगावकर ,मोईन तडवी, अनिता काकरवाल इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow