बुध्द धम्म स्विकारून जपानने प्रगती केली आता हा बुद्ध धम्म जगात पोहोचवण्याची जबाबदारी भारताची - भदंत हेन जूनसेई तेरसावा
बुद्ध धम्म स्वीकारून जपानने प्रगती केली आता हा बुद्ध धम्म जगात पोहोचण्याचे जबाबदारी भारताची -भदंत हेन जूनसेई तेरसावा
ऐतिहासिक जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे थाटात उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. भारताचा बुद्ध धम्म स्वीकारून जपानने प्रगती केली. आता हा बुद्ध धम्म जगात पोहचवण्याची जबाबदारी भारताची आहे, असे प्रतिपादन आशियातील निम्पोजन म्योहोजीचे संस्थापक आणि जपान येथील भदन्त हेन जुनसेई तेरसावा यांनी केले.
जटवाडा रोडवरील भीमटेकडी येथील विश्वशांती बुद्ध विहार परिसरामध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेला गुरुवारी सुरुवात झाली. भदंत तेरसावा यांनी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी महापौर समीर राजूरकर, भदन्त डॉ. सत्यपाल महाथेरो, पुरातत्वतज्ञ अतुल भोसेकर, उद्योजक विलास डोळसे, जालिंदर शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. भदंत जुनसेई तेरसावा यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. ‘भारत ही बुद्धाची भूमी आहे. अडीच हजार वर्षापूर्वीचा बुद्धांचा धम्म जपानमध्ये येण्यासाठी तब्बल एक हजार वर्षे लागले. एक हजार वर्ष उशिराने जपानने बुद्ध धम्म मनापासून स्वीकारल. त्या धम्मामुळेच जपानची मोठी प्रगती झाली आहे. रशियाने युक्रेनवर युद्ध लादले त्याला चार वर्षे झाले. हे युद्ध आधुनिक काळातील सर्वात भीषण युद्धांपैकी एक आहे. दररोज बॉम्ब हल्ले होतात. उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात युक्रेनमध्ये वीज केंद्र नष्ट झाले. त्या देशाची बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांच्या विचाराची गरज आहे’, असे तेरसावा म्हणाले. डॉ. अरविंद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अजिंठा, वेरुळ आणि औरंगाबाद लेणीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झलेल्या भूमीत जागतिक बौद्ध धम्म परिषद होत असल्याबद्दल मुख्य संयोजक भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांनी आभार मानले. दोन वर्षापासून परिषदेची तयारी केली जात होती. या काळात प्रशासनाकडून मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगीतले. महापौर समीर राजूरकर यांनी माताजी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. प्रशासन आणि महापालिका सर्वोतोपरी सहकार्य करील, असे आश्वासन दिले. या परिषदेला जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, तिबेट या देशातील भिक्खू संघ उपस्थित आहे
त.
What's Your Reaction?