डाॅ.प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित...? आमदार अब्दुल सत्तार यांचे पोस्टर झळकले...

 0
डाॅ.प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित...? आमदार अब्दुल सत्तार यांचे पोस्टर झळकले...

डाॅ.प्रतापसिंह पाटील यांचा विजय निश्चित, आमदार अब्दुल सत्तार यांचे पोस्टर झळकले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे डाॅ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांची विजयी घोडदौड सुरू आहे. चार ते पाच वाजेपर्यंत विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतापसिंह यांना पाठिंबा दिल्याने पाटलांचा विजय सोपा झाला अशी प्रतिक्रिया त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळण्याची तयारी सुरू आहे अब्दुल सत्तार यांनी अगोदरच प्रतिक्रिया दिली होती आम्ही विजयाचा गुलाल उधळू अशी सत्य परिस्थिती आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी किंग मेकर लिहलेले अब्दुल सत्तार यांचे पोस्टर झळकावून आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे. यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. अब्दुल सत्तार हे महायुतीचे असताना या निवडणुकीत पाटील यांना पाठिंबा दिल्याने मतदारांनी प्रतिसाद दिला. यामुळे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने जात असल्याचे चित्र आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow