सतीश चव्हाण पदवीधरांचे पसंती क्रमांक एक - अमरसिंह पंडित
सतीश चव्हाणच पदवीधरांचे पसंती क्रमांक एक - अमरसिंह पंडित
गेवराईतील वकील बांधवांशी सवांद
गेवराई, दि.20(डि-24 न्यूज) -मराठवाडा पदवीधर संघाचे महायुती उमेदवार सतीश भानुदास चव्हाण यांनाच पसंतीक्रमांक एक द्या असे आवाहन माजी मंत्री अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात महाविद्यालय तथा वकील संघाच्या बैठकी दरम्यान केले . वकील संघातील पदवीधर मतदारांना आवाहन करताना आपला पसंती क्रमांक एक सतीश चव्हाणच असतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज गेवराई येथे पदवीधर वकील मतदारांशी संवाद साधला. मागील तीन कार्यकाळात पदवीधरांचे नेतृत्व करताना सतीशभाऊंनी मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. विधी क्षेत्रातील विविध प्रश्नावर आ. सतीश चव्हाण यांनी कार्य केले आहे पुढे ही करतील हा विश्वास यावेळी श्री अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल लॉ स्कूल मंजूर होण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा असो किंवा गेवराईसारख्या भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी केलेले सहकार्य असो, त्यांच्या कामाची ठोस उदाहरणे आपल्या समोर आहेत. आज सोशल मीडियावर ‘सतीश चव्हाण यांनी काय केले...?’ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांच्या या कामातूनच स्पष्ट उत्तर मिळते. पदवीधर, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. यावेळी उपस्थित पदवीधर मतदारांशी विविध विषयांवर संवाद साधला व श्री. सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?