भारत पर्व 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटन दालनास भेट...

 0
भारत पर्व 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटन दालनास भेट...

भारत पर्व 2026 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटन दालनास भेट

मराठवाड्याच्या पारंपरिक पैठणी कलेची घेतली दखल...

पैठणी विणकाम, कौशल्य प्रशिक्षण व रोजगारनिर्मितीबाबत साधला संवाद...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) - गुजरातमधील एकतानगर (केवडिया) येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात आयोजित भारत पर्व 2026 या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक पैठणी साड्या व त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीची आस्थेने पाहणी केली.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पैठणी साड्यांची निर्मिती प्रक्रिया, पारंपरिक विणकामाचे वैशिष्ट्य, कलाकुसरीतील बारकावे व या कलेचे सांस्कृतिक महत्त्व याविषयी प्रधानमंत्र्यांना माहिती दिली.

विशेष म्हणजे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमातूनही पैठणीचा उल्लेख केला होता. भारत पर्वमधील भेटीदरम्यान त्यांनी या पारंपरिक वस्त्रकलेची पुन्हा एकदा आवर्जून दखल घेतली.

यावेळी उपसंचालक विजय जाधव यांनी पैठणी विणकर कविता अरुण ढवळे यांची प्रधानमंत्र्यांशी ओळख करून दिली. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना आतापर्यंत किती जणांना पैठणी विणकामाचे प्रशिक्षण दिले आहे, याबाबत आवर्जून विचारणा केली. या संवादादरम्यान पारंपरिक पैठणी कलेच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी व नवउद्योजकतेला चालना देण्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली.

भारत पर्व 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे उभारण्यात आलेल्या दालनातून राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वारसा, पारंपरिक हस्तकला, हातमाग उद्योग, कला-संस्कृती व खाद्यसंस्कृतीचे दर्शन देशभरातील पर्यटक व अभ्यागतांना घडविण्यात येत आहे.

प्रधानमंत्र्यांच्या भेटीमुळे मराठवाड्याची ओळख असलेल्या पैठणी कलेसह महाराष्ट्राच्या पारंपरिक हस्तकला व सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. राज्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनेही ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.

यावेळी सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी शोएब शाह व किरण गाडेकर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow