शहरात एमपीजेच्या राष्ट्रीय अधिवेशनात अॅड प्रशांत भूषण येणार...
एमपीजेचे राष्ट्रीय अधिवेशन“सन्मानाने जगण्याचा अधिकार” —
ॲड. प्रशांत भूषण आणि सय्यद सआदतुल्लाह हुसेनी यांचे मार्गदर्शन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)-मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ) यांनी "सन्मानाने जगण्याचा अधिकार" या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत ' शहरातील तापडिया मंदिर येथे अधिवेशन आयोजित केले आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या अधिवेशनात सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील प्रशांत भूषण हे मार्गदर्शन करतील अशी माहिती पत्रकार परिषदेत परिषदेला MPJ चे प्रदेश सचिव मेहमूद खान आणी प्रदेश मिडीया सचिव एस.जी हक़ अब्दुल अजीम पाशा, आदील मदनी यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई, महागडी खासगी रुग्णालये आणि शिक्षणातील वाढती विषमता हे मुद्दे अधोरेखित करण्यात आले.
मेहमूद खान यांनी सांगितले की मराठवाड्यासारख्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो. टँकरवर अवलंबून राहणे हे संविधानातील कलम 21 अंतर्गत असलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराला बाधा आणणारे आहे.
एस जी हक़ यांनी खासगी 'फाईव्ह स्टार हॉस्पिटल संस्कृती'वर टीका करत सांगितले की सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कमकुवत झाल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना महागड्या उपचारांसाठी कर्ज घ्यावे लागत आहे.
शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांचा दर्जा घसरत असून, चांगले शिक्षण केवळ श्रीमंतांपुरते मर्यादित होत असल्याने समाजात दरी वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
शहरात एमपीजेचे राष्ट्रीय अधिवेशन 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता, तापडिया नाट्य मंदिर, येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या अधिवेशनात ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसेनी, एपीसीआरचे सचिव वासिक नदीम, ‘युवा हल्ला बोल’चे अध्यक्ष अनुपम, एमपीजेच्या सुप्रीम कौन्सिलचे संयोजक जमीर कादरी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व वकील अभय टाकसाळ मार्गदर्शन करणार आहेत.
एमपीजेने नागरिकांना आवाहन केले की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संविधानाधारित सामाजिक न्याय आणि सन्मानाच्या जीवनासाठीच्या चळवळीत सामील व्हावे.
जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मोहसिन शेख, शहराध्यक्ष मुख्तार शेख, इम्रान देशमुख, आणि करीम बेग पत्रकार परिषदेत एमपीजेच्या स्थानिक टीमकडून उपस्थित होते.
What's Your Reaction?