जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या तारखांमध्ये बदल...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल...
मुंबई, दि.29(डि-24 न्यूज) -
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील काही टप्प्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान व 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र नव्या निर्णयानुसार आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 115 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करणे, माघारी घेणे, चिन्ह वाटप आदी टप्पे पूर्ण झाले असून आता मतदान व मतमोजणीचे टप्पे बाकी आहेत.
7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. निवडणूक प्रचाराची सांगता 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणी आदर्श आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
या जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आहेत निवडणूक....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, धाराशिव व लातूर येथे या निवडणुका होत आहेत.
What's Your Reaction?