परीक्षा प्रक्रीयेत पारदर्शकतेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाचा पुढाकार...

 0
परीक्षा प्रक्रीयेत पारदर्शकतेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाचा पुढाकार...

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाचा पुढाकार...

दररोज 6 ते 7 परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण मोहीम

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - इयत्ता दहावी व बारावीच्या सुरू असलेल्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाभर दररोज सरासरी सहा ते सात परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची टोकन पद्धतीने तपासणी, प्रवेशद्वारावर शारीरिक तपासणी, हॉलतिकिट व ओळखपत्रांची पडताळणी, परीक्षा कक्षातील आसनव्यवस्था तसेच सीसीटीव्ही यंत्रणांची पाहणी यांचे बारकाईने चित्रीकरण केले जात आहे. परीक्षा केंद्रांवर शिस्तबद्ध वातावरण राखले जात आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी दक्षता पथकांसह स्वतंत्र चित्रीकरण पथक कार्यरत आहे.

प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची तपासणी करताना कोणतीही अनुचित साधने आत नेली जाऊ नयेत यासाठी काटेकोर खबरदारी घेतली जात आहे. परीक्षागृहात कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी निरीक्षकांकडून सतत देखरेख केली जात असून या सर्व प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण व्हिडिओ स्वरूपात केले जात आहे.

या उपक्रमामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांमध्येही शिस्त व जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर टप्प्याटप्प्याने चित्रीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, ही मोहीम संपूर्ण परीक्षा कालावधीत सुरू राहणार आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असल्याने ती पूर्णपणे स्वच्छ, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीमती अश्विनी लाठकर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी स्पष्ट करण्या

त आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow