पंतप्रधान आवास योजना, हर्सुल येथील सदनिकांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल यांची मागणी

 0
पंतप्रधान आवास योजना, हर्सुल येथील सदनिकांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल यांची मागणी

पंतप्रधान आवास योजना, हर्सूल येथील सदनिकांच्या निकृष्ट कामाची चौकशी करा 

शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांची आयुक्तांकडे मागणी 

पै-पै जमा करून घराचे स्वप्न पाहणाऱ्या गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना हटवा 

छत्रपती संभाजीनगर, दि.31 (डि-24 न्यूज) - महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हर्सूल येथे पंतप्रधान आवास योजनेच्या सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीभगत असून, चौकशी समितीने गंभीर दखल घेत काम बेसुमार दर्जा आणि निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना, हर्सूल येथील सदनिकांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांनी आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली आहे.

याबाबत गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन पै-पै जमा करून घराचे स्वप्न पाहणाऱ्या गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तत्काळ हटवा, अशी मागणी जैस्वाल यांनी केली.

निवेदनात म्हटले की, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सदर कंत्राटदार एजन्सीच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहे. दि. 21 मे 2026 थर्ड पार्टी क्वालिटी एजन्सी (टीपीक्यूएमए) यांच्या अहवालानुसार सदर कामाचा दर्जा अत्यंत सुमार व धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी दिलेला आहे. मनपा प्रशासनाने सदर अहवालाकडे कानाडोळा करुन कंत्राटदाराचे देयके अदा करण्याची घाई झालेली आहे. सदर अहवालात कामाबाबत The Quality work is exteremely poor & the structural stability is at serious risk असले गंभीर अभिप्राय नोदंवलेला आहे. मनपा प्रशासनाला कंत्राटदाराला तात्काळ काम थांबविण्याचे निर्देश दिले आहे. तसेच टीपीक्यूएमए अहलवालामध्ये Reinforcement lapping has been carried out in the danzer zone, which way compromise structural intergrity अश्या प्रकारे आपले निष्कर्श नोंदवलेले आहेत. सदर प्रकल्पात राबविण्यात आलेल्या निविदेतील 8.21 RCC underground water tank हे किमान M30 ग्रेड काँक्रेट Is 456-2000 व वॉटर प्रुफ ट्रीटमेंट असणेकरवत नमुद असतांना निवेदेतील अटीचे पालन करता प्रत्यक्षात Brick work मध्ये केल्याचे दिसून येते.

निवेदेतील अट क्र.17.13 नुसार कामगारांच्या हक्क संरक्षणाबाबत निर्देशीत केलेले आहे. त्या अटीनुसार सदर प्रकल्पात काम करणा-या कामागारांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्याचे दिसून आले आहे. कामगारांना किमान वेतन कायदयानुसार EPF चा भरणा कामगारांच्या खात्यामध्ये केलेला नाही तसेच ESIC पण भरलेली नाही. तसेच Professional Tax अपूर्ण भरणा केलेला आहे. त्यामुळे कामगार कायादयातील तरतूदीचा भंग करण्यांत आलेला आहे. या प्रकल्पावर कार्यरत अधिकारी हे निविदेतील अटीवर लक्ष देत नाही. त्यांच्या कंत्राटदाराला फायदा होईल याचा जास्त कल आहे. तेथे कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या नियुक्ती इतरज करुन सक्षम अधिका-यांची नियुक्ती करावी. या प्रकल्पातील घरामध्ये शहरातील गरीब निराधार कुटुंबातील सदस्य वास्तव्यास येणार असून अश्या निकृष्ट व गुणवत्ता हीन कामामुळे त्यांच्या जीवाचे वरे वाईट होवू शकते त्यामुळे थर्ड पार्टीच्या अहवालानुसार सदर काम तातडीने थांबवून अयस्त संस्थेमार्फत कामाची गुणवत्ता तपासावी व निवेदेतील अटीचे पालण झाल्याशिवाय कंत्राटदाराचे बिले अदा करण्यांत येऊ नये, असे नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी सांगितले.

यावेळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow