भारतीय सैन्यदलाचे कौतुक करण्यासाठी काँग्रेस काढणार तिरंगा यात्रा....

भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे 21 मे रोजी तिरंगा यात्रा...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)
आज पक्ष कार्यालय, गांधी भवन येथे आ. राजेश राठोड व शहर जिल्हाध्यक्ष मा. शेख युसूफ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पहलगाम सारख्या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे 21 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
सदरील यात्रा बुधवार रोजी सकाळी 9:30 वा. महात्मा गांधी पुतळा येथून सुरू होऊन - शहागंज - चेलीपुरा - अण्णाभाऊ साठे चौक मार्गे - भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाने संपन्न होईल. जय हिंद व याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित यात्रा होईल.
या पदयात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन शहर काँग्रेस चे प्रभारी आ.राजेश राठोड व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.शेख युसुफ यांनी केले.
यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष किरण पाटील, जग्गनाथ काळे, प्रा. मोहन देशमुख, महेंद्र रमंडवाल, अनिस पटेल, कैसर बाबा, कन्नड तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, इंजि. मोहसीन खान, डॉ. अरुण शिरसाठ, साजेद कुरेशी, नदीम सौदागर, एम. डी. पठाण, शेख फय्याजोद्दीन, आमिन खान, शेख शाहरुख, जाफर खान, किशोर चावरिया, मुदस्सीर अन्सारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






