जुना मोंढ्यात पाईपलाईन फुटली, आमदार संजय केनेकर यांच्या प्रयत्नामुळे बालकांना सुखरुप बाहेर काढले

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) शनिवारी रात्री जुना मोंढा ए-1 किराणाच्या गल्लीत पाण्याची मोठी पाईप लाईन फुटल्याची घटना घडली. पाईप लाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केनेकर व माजी नगरसेवक रामेश्वर भादवे तेथे पोहोचले. तेथे बघितले तर पाण्याच्या प्रवाहामुळे तीन ते चार लहान मुले, दोन महीला, एक पुरुष नाल्याच्या बाजूला अडकली होती. परिसरातील लोकांच्या मदतीने त्या बालकांना सुखरुप बाहेर काढले. नाल्यात वाहून जाण्याची भीती होती त्यांना सुखरुप काढण्यात यश मिळाले. तात्काळ मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांना फोन करुन घटनेचे गांभीर्य कळवले. फायर ब्रिगेड यंत्रणा तेथे पोहोचली व सुदैवाने जीवीतहानी टळली. नंतर मनपाच्या पाणीपुरवाठा विभागाच्या वतीने पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु झाले.
What's Your Reaction?






