शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, शिवसेना पक्षप्रमुख

 0
शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, शिवसेना पक्षप्रमुख

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री, मंत्री, शिवसेना पक्षप्रमुख

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री, मंत्री, शिवसेना पक्षप्रमुख व राज्यातील प्रतिष्ठितांनी हजेरी लावत धर्मराज व रश्मीला आशिर्वाद दिला.

राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे सुपुत्र धर्मराज दानवे व कळंब येथील राजेंद्र मडके यांची द्वितीय कन्या रश्मीचा शाही विवाह सोहळा बायपास येथील डिवाईन सिटी(सहारा सिटी) येथे आज शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यात वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार संजय सिरसाट,

शिवसेना नेते अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजीमंत्री राजेश टोपे, सुषमा अंधारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन व राज्यातील आमदार, खासदार व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow