राहुल गांधी यांचा वाढदिवस सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी साजरा...!
विरोध पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन....
सेवा, समता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देत काँग्रेस तर्फे ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिवसभर शहरभरात विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवा, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दिवसभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने सकाळी 9 वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाने झाली. पर्यावरण रक्षण आणि स्वच्छ शहराचा संदेश देत कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले. अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सकाळी 11 वाजता पीर गैब साब दर्गा येथे विशेष दुआचे आयोजन करण्यात आले, यावेळी सामाजिक सलोखा, शांतता आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. NSUI च्या वतीने पक्ष कार्यालय गांधी भवन येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शहरातील सलीम अली सरोवर गार्डन येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य, बॅग वाटप, घाटी रुग्णालयात रुग्णांना व्हील चेअर वाटप, फळवाटप करून सामाजिक सेवाभाव जपण्यात आला.
सर्वधर्म समभावाचा संदेश देत यांच्या वतीने धावणी मोहल्ला येथील गुरुद्वारा येथे सकाळी 11 वाजता प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बिशप चर्च येथे सायंकाळी 6 वाजता प्रार्थना कार्यक्रम झाली. दुपारी 3 वाजता बुद्ध लेणी येथील बुद्ध विहार येथे प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सायंकाळी 5.30 वाजता मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन सिडको येथे करण्यात आला.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा, एकता, बंधुता आणि लोकहिताचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमांद्वारे करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे कार्यक्रम सामाजिक जबाबदारी आणि जनसेवेचा आदर्श निर्माण करणारे ठरणार आहेत असे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम म्हणाले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, माजी अध्यक्ष शेख युसूफ, जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, डॉ. पवन डोंगरे, इक्बालसिंग गिल, आमेर अब्दुल सलीम, डॉ. निलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, विश्वास औताडे, योगेश थोरात, मोईन इनामदार, जास्मिन फ्रान्सिस, मोहम्मद जाकेर, मोईन कुरेशी, गुरमित गिल, शेख अथर, आबेद हुसेन, शफीक शहा, अनिस पटेल, मुकेश सोनवणे, गणेश जाधव, शेख कैसर बाबा, नदीम सौदागर, योगेश थोरात, साहेबराव बनकर, चंद्रकांत बनसोडे, मुनीर पटेल, प्रकाश पाटील, मोहसीन खान, डॉ. शदाब खान, प्रतीक पाटील, जयपाल दवणे, उत्तम दनके, इरफान पठाण, अजय डिडोरे, अशोक पगार, दिपक खानसे, दुर्गेश वैद्य, डॉ. सिकंदर शेख, पुंडलिक चव्हाण, रामभाऊ लोखंडे, रज्जाक पटेल आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थि
त होते.
What's Your Reaction?