इम्तियाज जलिल यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल...

इम्तियाज जलिल यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबावर साजापूर येथे शासकीय जमिन लाटल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करताना एका विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुरुवारी उशिरा रात्री लक्ष्मण हिवराळे यांच्या तक्रारीवरुन अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.
पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी अनेक पुरावे गोळा केले आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. ज्या जातीला मान्यता नाही हा शब्दप्रयोग त्यांनी 11 जून दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत केल्याने समाजाचा अपमान झाला आहे. एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
What's Your Reaction?






