सिद्धार्थ गार्डन दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

मनपाच्या उद्यानाचे द्वार कोसळून मृत्यूस कारणीभूत सर्वांचीच उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करा- राजेंद्र दाते पाटील यांची मागणी
मनपा प्राणी संग्रहालयात देखील उच्च शिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेमा... !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) मनपा शहर परिसरात बुधवारी 11 जून 2025 रोजी सायंकाळी सिद्धार्थ उद्यान येथील वास्तू कोसळून निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत कंत्राटदार आणि बेपर्वाइ करून वास्तु पूर्णत्वाचे योग्यता प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित सर्वच दोषींवर गुन्हा दाखल करून या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन सत्यता जनते समोर आणि अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास विभाग एकनाथ शिंदे यांचे कडे पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केली.
आपल्या सविस्तर निवेदनात त्यांनी नमुद केले की, शहरात वेगाने वादळी वारे वाहिले. वादळात सिद्धार्थ उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार पर्यटकांच्या अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. यात 4 जण किरकोळ जखमी आहेत. स्वाती अमोल खैरनार वय 37, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी व रेखा हरिभाऊ गायकवाड, वय 65, रा. एन-11 गजानननगर, हडको अशी मृत महिलांची नावे आहेत. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत कंत्राटदार आणि बेपर्वाइ करून वास्तु पूर्णत्वाचे योग्यता प्रमाण पत्र देणाऱ्या संबंधित सर्वच दोषींवर गुन्हा दाखल करून या गंभीर प्रकरणात न्याय द्यावा आणि गुन्हा दाखल करणे आवश्यक असुन सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सिद्धार्थ उद्यानाचे सिमेंटचे गेट पर्यटक पथ विक्रेत्यांच्या अंगावर पडले यावेळी प्रचंड गोंधळउडून आक्रोश सुरू झाला. पर्यटक स्वाती खैरनार, रेखा गायकवाड यांच्या डोक्यावरच सिमेंट आणि विटा कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर शेख अकील रहीम हा गंभीर जखमी झाला आहे. इतर 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत मृतांच्या नातेवाइकांना दहा लाख रुपयांची मदत तात्काळ करावी घडलेली घटना दुर्देवी आहे. यामुळे या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारा वर आणि या वास्तूस कशाचे आधारे बांधकाम करण्याची परवानगी दिली होती याच्या सह देखरेख करणारे अभियंते यांची ही चौकशी होऊन त्यांचेवर देखील तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश होणे गरजेचे असुन तज्ञ वरिष्ठ चौकशी समिती नेमावी आणि मनपाच्या व मनपाच्या ताब्यातील सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करुन मनपा प्राणी संग्रहालयात देखील उच्च शिक्षीत पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाही म्हणुन मनपातील अनुभवी उच्च शिक्षीत सर्जन यांना तात्काळ नियुक्त करण्याचे आदेश व्हावेत अशी ही मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी केली आहे.
What's Your Reaction?






