खंडाळ्याच्या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करण्याची इम्तियाज जलिल यांची मागणी...

खंडाळ्याच्या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करण्याची इम्तियाज जलिल यांची मागणी...
वैजापूर, दि.13(डि-24 न्यूज) गुरुवारी रात्री वैजापूर तालूक्यातील खंडाळा येथे झालेल्या मारहाणीत मोईन शहा या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या सतर्कतेने तणाव निवळला. सध्या खंडाळा गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेत अबरार शेख हा युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वैजापूर सामान्य रुग्णालयात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांनी नातेवाईकांची भेट घेतली व आरोपिंना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली. इम्तियाज जलिल यांनी पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड यांची पोलिस अधिक्षक कार्यालयात भेट घेतली. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे या गंभीर घटनेतील दोषींना तात्काळ अटक करुन कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. पोलिस अधिक्षकांनी खात्री दिली जलदगतीने आरोपिंना अटक करण्यात येईल. आरोपिंना पळून जाण्याची संधी दिली जाणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासा प्रशासन सतर्क आहे.
What's Your Reaction?






