औरंगाबाद क्रीकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी टोळी कार्यरत - शिरीष बोराळकर

 0
औरंगाबाद क्रीकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी टोळी कार्यरत - शिरीष बोराळकर

औरंगाबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी टोळी कार्यरत - शिरीष बोराळकर 

बोराळकरांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप... निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात व धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार, 2016 मध्ये निवडून आलेली कार्यकारिणी न्यायालयाने रद्द केली होती तरीही बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा आरोप, एसिएवर प्रशासक बसवण्याची मागणी, निधी लाटण्यासाठी मुंबई क्रीकेट असोसिएशनची दिशाभूल, तक्रार करणार 

क्रीडा संघटनांतील भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर उघड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील औरंगाबाद क्रीकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि सत्तेचा उघड गैरवापर सुरू असून, एका विशिष्ट टोळीने संपूर्ण क्रीडा क्षेत्र बंधक बनवले आहे, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप औरंगाबाद क्रीकेट असोसिएशनचे माजी पदाधिकारी शिरीष बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. 

त्यांनी पुढे सांगितले शहरात प्रतिभावंत खेळाडू आहेत त्यांना संघटनेच्या मैदानात चांगली व दर्जेदार सुविधा मिळाली तर देशासाठी खेळण्याची धमक त्या खेळाडूंमध्ये आहे परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने भविष्य उद्ध्वस्त होत आहे. जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना डावलून स्वतःच्या मर्जीतील खेळाडूंनाच संधी दिली जाते. निवड प्रक्रिया म्हणजे फक्त नावापुरती आहे. आवडीचा खेळाडू नसेल तर त्याला जाणीवपूर्वक खाली खेचले जाते. यामुळे अनेक होतकरू खेळाडूंचे करिअर संपवले जात आहे. सन 2016 मधील निवडणूक प्रक्रियेत मेंबरशिप वाढवून, बनावट सदस्य दाखवून निवडणूक रोखण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि पदाचा गैरवापर करत स्वतःचा फायदा करून घेतला. त्यामुळे काही सदस्यांची मेंबरशिप रद्द करण्यात आली आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागली. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने 2009 साली निवडून आलेली कार्यकारिणी केवळ 3 वर्षांसाठी होती. मात्र नियम धाब्यावर बसवून हीच मंडळी तब्बल 7 वर्ष सत्तेत राहिली. दरवर्षी निवडणूक घेणे बंधनकारक असताना ती जाणूनबुजून टाळण्यात आली, असा घणाघात त्यांनी केला.

खेळाडूंना राजकारणात ओढून मानसिक छळ...

खेळाडूंना खेळ सोडून राजकारणात ओढले जात आहे. निवडणूक, गटबाजी, दबाव, धमक्या यामध्ये खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक घुसमट होत आहे. हे अत्यंत घातक आहे,” असे ते म्हणाले.

या घाणेरड्या कारभाराचा भाग नको म्हणून मी अलिप्त राहिल. या सगळ्या बेकायदेशीर प्रक्रियेचा भाग होणे मला मान्य नव्हते. म्हणूनच मी कोणत्याही बैठकींना हजर राहिलो नाही, कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. केवळ औपचारिक कार्यक्रमांनाच उपस्थित राहिलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण चौकशीची मागणी...

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा बोराळकर यांनी दिला. या आरोपांमुळे संभाजीनगरच्या क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow