खुलताबाद 77.81, गंगापूर 67.71, फुलंब्री 76.80, सोयगाव 68.60, सिल्लोड 80.56 टक्के मतदान...

 0
खुलताबाद 77.81,  गंगापूर 67.71,  फुलंब्री 76.80,  सोयगाव 68.60, सिल्लोड 80.56 टक्के मतदान...

खुलताबाद 77.81, गंगापूर 67.71, फुलंब्री 76.80, सोयगाव 68.60 टक्के मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शांततेत पार पडली, उशिरा रात्री पर्यंत काही मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा असल्याने फायनल टक्केवारी मिळाली नाही जी टक्केवारी प्रशासनाने पाठवली ती प्रकाशित करत आहोत...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) - आज जिल्हा परिषदेच्या 62 गटात कडक पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले. यासोबतच जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या गणात निवडणूक संपन्न झाली. मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत खुलताबाद मधील 104 मतदान केंद्रावर 77.81 टक्के मतदान झाले. बाजार सावंगी गटात 77.82, गदाना 81.15, वेरुळ 74.82 टक्के मतदान झाले. सोयगाव तालुक्यात अंदाजे 68.60 टक्के मतदान झाले. 87747 मतदार होते त्यापैकी 60198 मतदारांनी मतदान केले. गंगापूर तालुक्यात 67.72 टक्के मतदान झाले. सावंगी 64.33, अंबेलोहळ 68.58, रांजणगाव शेणपुंजी 58.59, वाळुज बु 61.57, तुर्काबाद 70.07, शिल्लेगांव 70.32, नेवरगांव 69.01, जामगाव 76.97, शेंदुरवादा 77 टक्के मतदान झाले. फुलंब्री तालुक्यात एकूण मतदान 76.80 टक्के झाले. बाबरा 73.65, वडोदबाजार 79.17, पाल 78.09, गणोरी 76.15 टक्के मतदान झाले.

सिल्लोड तालुक्यात 80.56 टक्के मतदान झाले. 105539 पुरुष, 94965 महीलांनी मतदान केले. एकूण 200504 मतदारांनी आपल्या मतांचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाने वैजापूर, पैठण, कन्नड, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी प्राप्त झाली नाही आल्यानंतर प्रकाशित केली जा

ईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow