अमित शाह यांचे शहरात आगमन, उद्या जाहीर सभा, शहरातील काही रस्ते बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा

 0
अमित शाह यांचे शहरात आगमन, उद्या जाहीर सभा, शहरातील काही रस्ते बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा

अमित शाह यांचे शहरात आगमन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत, उद्या मंगळवारी जाहीर सभा

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज रात्री 11 वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  विजया रहाटकर, पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ.सुभाष भामरे, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शहरात दौरा असल्याने VVIP सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 4 आणि 5 मार्चला पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नो ड्रोन झोन घोषित केले आहे. पोलिस उपायुक्त मनोज लोहिया यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

उद्या सायंकाळी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शाह यांची जाहीर सभा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे त्या अगोदर ते जळगाव दौ-यावर जाणार आहे. सांस्कृतिक मंडळाच्या सभेसाठी मोठी गर्दी होणार असल्याने वाहनांची शहरात मोठी वर्दळ होणार आहे. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून नियोजन करण्यात आली आहे. म्हणून उद्या 5 मार्चला दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे. आयटीआय ते खडकेश्र्वर टी पाॅईंट , जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, जुबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, मिल काॅर्नर ते खडकेश्र्वर मार्गे महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता, गीता झेरॉक्स ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे.

मिल काॅर्नर ते भडकलगेट मिल काॅर्नर ते वरद गणेश मंदिर मार्गे सावरकर चौक रस्त्याचा पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow