मोठी बातमी, सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
मोठी बातमी, सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना, उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...!
बारामती, दि.30(डि-24 न्यूज)- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार या उशिरा रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्या महाराष्ट्रातील पहील्या महीला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी अजित पवार यांचा वारसा चालवावा त्यांच्या आग्रहाखातर सुनेत्रा पवार या शपथ घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत जय पवार, नरेश अरोरा हे सुद्धा निघाले आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे की अचानक त्यांच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी येईल कोणीही कल्पना केली नव्हती. अजित दादा पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर येईल असे कोणालाही वाटले नव्हते परंतु एवढा मोठा आघात पवार कुटुंबावर आला यानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली. त्यांचा शपथविधी शनिवारी होईल असे मानले जात आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना पवार कुटुंबाचा राजकीय वारसा आहे. त्यांनी महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आता त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळतील.
What's Your Reaction?