विधानसभा निवडणुकीत पर्याय म्हणून परिवर्तन आघाडीची स्थापना - राजू शेट्टी
विधानसभा निवडणुकीत पर्याय म्हणून परिवर्तन आघाडीची स्थापना - राजू शेट्टी
छ.सभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समविचारी पक्ष व संघटना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट, भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे, दत्ता पवार यांची उपस्थिती होती.
शेट्टी यांनी पुढे सांगितले राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या भांडणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांचे होत आहे. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जवाबदारी ओळखून शेतकरी चळवळीतील संघटना व पक्षांनी एकत्रित परिवर्तन आघाडीची स्थापना केली आहे. हि आघाडी विधानसभा निवडणूक लढणार आहे. 24 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे भव्य मेळावा घेण्यात येईल. परिवर्तन आघाडी राज्यातील 288 जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे. पदाधिकारी यांच्या बैठकीत मेळावा घेण्याचे ठरले. निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावी अशी आघाडीची भूमिका आहे. कोणत्याही आघाडीशी हातमिळवणी होणार नाही. कारण लहान पक्षांना सोबत घेऊन त्यांचे लोक फोडण्याचे काम आघाड्या करतात असा अनुभव मला महादेव जानकर, विनायक मेटे, बच्चू कडू यांना वाईट अनुभव आला असल्याचा आरोप शेट्टी यांनी लावला. परिवर्तनाची लाट आली तर प्रस्थापित आघाड्या पराभूत होतात याचे उदाहरण लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले. महाराष्ट्रात 66 लाख तरुण बेरोजगार आहेत. कर्जाच्या ओझ्याने राज्य दबलेले असताना आम्ही सर्व सामान्यांच्या बाजूने लढणार आहोत असे वामनराव चटप यांनी सांगितले.
What's Your Reaction?