हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष...!

हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) विदर्भ बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची मोठी जवाबदारी दिली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमेटीचे जनरल सेक्रेटरी के.सी.वेनुगोपाल यांनी आज त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हायकमांडने त्यांचा राजीनामा मंजूर केला व त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. सपकाळ हे बुलढाणा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व सध्या राजीव गांधी पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कार्यरत होते. पक्षाला महाराष्ट्रात काँग्रेसला मजबूत करण्याचे आवाहन असणार आहे. त्यांच्या निवडीनंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






