मनपाच्या क्रीडा महोत्सवाची सांगता, बनेवाडी शाळेचे उत्कृष्ट प्रदर्शन, प्रियदर्शनी शाळेला सहा चषक...
मनपाचा क्रीडा महोत्सवाची सांगता...
मनपा बनेवाडी शाळेचे उत्कृष्ट प्रदर्शन...
प्रियदर्शनी शाळेने मिळवले सहा चषक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा क्रीडा महोत्सवाचे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले होते. या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून प्रसिद्ध हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले, मेजर ध्यानचंद , आयुक्त जी श्रीकांत आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन सागर मगरे क्रीडा प्रशिक्षक यांनी केले. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सव मध्ये एकूण आठ क्रीडा प्रकाराचा समावेश केला होता त्यामध्ये दोन गट तयार करण्यात आले होते 14 वर्षाखालील एक गट आणि 17 वर्षाखालील एक गट.
मुले आणि मुलींचा संघ हा स्वतंत्र होता या सांघिक क्रीडा स्पर्धा दिनांक 27 फेब्रुवारी आणि वैयक्तिक स्पर्धा 28 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडल्या असून पंच म्हणून दीपक सपकाळ, संतोष अवचार, सागर तांबे, रोहन पागोरे, स्वप्नील गुडेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण पद्मश्री धनराज पिल्ले व आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते पार पडले.
तर इतर क्रीडा स्पर्धेचे आणि मेडल आणि ट्रॉफी वितरण क्रीडा अधिकारी संजीव बालया, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे , क्रीडा अधिकारी खंडेराव यादवराव
प्रा राकेश खैरनार ,अमृत बिऱ्हाडे , संतोष अवचार
सागर मगरे ,केंद्रीय मुख्याध्यापक के बी चौधरी डॉ.संपत्ती दाटे, जगन्नाथ सपकाळ, राइस खान यांच्या हस्ते करण्यात आले.
संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
सांघिक प्रकारामध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी या केंद्राने सर्वात चांगले प्रदर्शन केले त्या खालोखाल मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय हर्सूल आणि मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर एक या शाळेने केले आहे.
निकाल...
क्रिकेट क्रीडा स्पर्धा
14 वर्षा आतील मुले विजयी संघ : मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं.1
उप विजेता संघ : मनपा केंद्रीय शाळा बनेवाडी.
17 वर्षातील मुले
विजय संघ : मनपा केंद्रीय शाळा बायजीपुरा.
उपविजय संघ : मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं.1
रस्सीखेच स्पर्धा
14 वर्षा आतील मुली
विजय संघ : प्रियदर्शनी
उपविजय संघ : मुकुंदवाडी
14 वर्ष खालील मुले
विजय संघ - प्रियदर्शनी
उपविजेता संघ - बन्सीलाल नगर
17 वर्षातील मुले
विजय संघ : हरसुल
उपविजय संघ : सिडको N7
17 वर्षाखालील मुली
विजेता संघ-बेगमपुरा
उपविजेता संघ-प्रियदर्शनी
खो -खो
14 वर्षे मुले
प्रथम मुकुंदवाडी मनपा स्कूल
द्वितीय बायजीपुरा मनपा स्कूल
14 वर्षे मुली
हर्सूल स्कूल प्रथम
नारेगाव स्कूल द्वितीय
सतरा वर्ष मुलं खो-खो
प्रथम बनेवाडी स्कूल, द्वितीय बन्सीलाल नगर स्कूल ,
१७ वर्ष मुली प्रथम बेगमपूरा स्कूल ,द्वितीय नारेगाव स्कूल. रस्सीखेच 14 वर्ष मुले प्रियदर्शनी स्कूल प्रथम बन्सीलाल नगर मनपा स्कूल दृतिय.
14 वर्षे मुली
प्रियदर्शनी स्कूल प्रथम मुकुंदवाडी मनपा स्कूल द्वितीय.
फेन्सिंग
17 वर्ष आतील मुले हर्सूल मनपा स्कूल प्रथम ,एन सेवन मनपा स्कूल द्वितीय.
17 वर्षातील मुली बेगमपुरा स्कूल प्रथम प्रियदर्शनी स्कूल द्वितीय.
डॉज बॉल 17 वर्ष मुली प्रथम मनपा स्कूल एन सेवन .
100 मीटर धावणे
14 वर्षातील मुली प्रथम प्रणाली कुलकर्णी सुप्रिया मस्के द्वितीय श्रावणी तुपे तृतीय
14 वर्षातील मुले
प्रथम क्रमांक रवी कुमार द्वितीय अरमान शेख तृतीय प्रतीक गजभारे .
17 वर्षे आतील मुली
निकिता गायकवाड, प्रथम नंदिनी सातपुते द्वितीय , सायमा शेख तृतीय
17 वर्षातील मुले
गौरव देहाडे प्रथम ,अपराध शेख द्वितीय,
विजय उमक तृतीय
गोळा फेक 14 वर्षातील मुले प्रथम समीर शेख, द्वितीय समर्थ जगदाळे ,आरमान शेख तृतीय
14 वर्षातील मुली प्रथम श्रावणी नरवडे, द्वितीय गीता साळुंखे ,तृतीया समीक्षा म्हस्के .
17 वर्षातील मुले प्रथम अशोक , द्वितीय सय्यद मुजमील ,तृतीय विवेक साठे .
17 वर्षातील मुली सायमा शेख प्रथम,
भाग्यश्री खरात द्वितीय सोलाशील दाभाडे तृतीय.
जम्प रोप 14 वर्षातील मुली
आली जा प्रथम ,द्वितीय सोनम , तृतीय साक्षी दाभाडे .
14 वर्षातील मुलं प्रज्वल प्रथम, तपशील द्वितीय रणजीत तृतीय .
17 वर्षातील मुली मशिरा मोहम्मद प्रथम ,द्वितीय पलत गिरी,तृतीय प्रतिज्ञा खंडारे.
17 वर्षातील मुलं गौतम गायकवाड प्रथम अरिहंत गायकवाड द्वितीय.
What's Your Reaction?