महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा आयुक्तांच्या जलश्री निवासस्थानी रंगला खो-खोचा खेळ...

 0
महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा आयुक्तांच्या जलश्री निवासस्थानी रंगला खो-खोचा खेळ...

हर्सूल वसाहत शाळेने दिली आयुक्त निवासस्थानी भेट

 खो खो शाळेने दिली जलश्री येथे भेट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि--24 न्यूज )- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून *मी आयुक्त होणार*या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत आज मनपा प्रा शाळा हर्सूल वसाहत या शाळेने जलश्री या निवासस्थानी भेट दिली.

 या शाळेतील विद्यार्थीनी विविध नृत्य सादर करण्यासाठी विविध वेशभूषा मध्ये आल्या होत्या विद्यार्थी सकाळी आल्याबरोबर खो खो खेळण्यासाठी तयारी करू लागले तेवढ्यात आदरणीय आयुक्त यांची भेट विद्यार्थ्यांनी घेतली आणि त्यांचे स्वागत मुलीनी *स्वागतम*या गाण्यावर नृत्य सादर करून केले. त्यानंतर मुलीनी 

ढोलना आणि मोबाईल बुरी बला है अशा विविध नाटक /गाण्यावर नृत्य सादर केले आदरणीय सर आणि आदरणीय मॅडम छोट्या छोट्या मुलींचे नृत्य पाहून प्रभावित झाले आणि मुलींना शाबासकी दिली मग सुरू तो प्रेरणादायी संवाद आणि संवाद मध्ये आदरणीय सरानी तुमच्या शाळेसाठी काय पाहिजे आणि तुम्हाला मोठे होऊन काय व्हायचे आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेसाठी खेळण्याचे साहित्य पाहिजे म्हणाले असता जे जे साहित्य तुम्हाला लागत आहे त्याची यादी करून ध्या तुम्हाला सर्व साहित्य दिले जाईल म्हणून सरानी सांगितले आणि मोठे होऊन कुणी आयुक्त कोणी खेळाडू तर कोणी नाटककार तर डान्सर व्हायचे म्हणाले तेव्हा सरानी जे जे तुम्हाला आवडते ते व्हा पण स्वप्न मोठे ठेवा आणि ते सत्यात उतरवून घेण्यासाठी भरपूर मेहनत करा असे सांगितले असता सराना विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत येण्याची विनंती केली असता मी शाळेला लवकरच भेट देतो म्हणून आदरणीय सरानी सांगितले सर्व विद्यार्थी खूप खूप खूष झाले आणि एकच आनंदाने सर्वजण विविध खेळ खेळायला सुरू केले खो खो ,कबड्डी , क्रिकेट, फुटबॉल असे विविध नाना प्रकारचे खेळ खेळल्यानंतर एकत्र भोजन घेतले रस्सीखेच झाले खेळता खेळता शिका या आदरणीय सरांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांना हर्सूल तलाव येथून येणारे पाणी आणि जमिनीत असणारी निजामकालीन टाकी दाखवण्यात आली व पाणी जपून वापरण्यावर मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांनी पाणी वाया जाऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतली.

सदर भेट ही अंकुश पांढरे उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख, व गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती भारत तिनगोटे शिक्षणाधिकारी व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी या साठी मेहनत घेतली तसेच या वेळी सुधाकर वानखडे (मुख्याध्यापक), रामेश्वर बोराडे , माधवी मोरे, दीपाली म्हस्के, दीपाली बागल उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow