संभाजीनगर... नगरसेवक अपात्रता सुनावणी डिसेंबरमध्ये
नगरसेवक अपात्रता प्रकरणी सुनावणी डिसेंबरमध्ये...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 10(1) व 10(1-ड) नुसार नगरसेवकांच्या सदस्यत्व अपात्रते संदर्भात आज सोमवार (दि. 23 नोव्हेंबर ) रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान विविध प्रकरणांवर सुनावणी प्रक्रिया पार पडली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने जारी केलेल्या सुनावणीच्या यादीमध्ये एकूण आठ प्रकरणांचा समावेश होता. यामध्ये अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे. संबंधित नगरसेवकांच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत ही सुनावणी घेण्यात आली.
यात पुढील सुनावणीसाठी नगरसेवक फिरोज खान यांना 28/12/26
,सय्यद उसामा अब्दुल कादरी 28/12/26 शाहीन पटेल 21/12/26, अली मीर वाजिद 30/11/26
मयूर वंजारी 28/12/26 ,शेख नर्गिस 30/11/26 व मेराज खान 30/11/26 तारीख देण्यात आली आहे.यांच्यासह संबंधित प्रकरणांतील तक्रारदारांची नावे यादीत नमूद करण्यात आली होती. काही प्रकरणांमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या कारणावरूनही अपात्रतेसंदर्भातील मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
What's Your Reaction?