बीड बायपास परिसरात पाणी प्रश्न सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, किशोर शितोळे यांच्या प्रयत्नांना यश

 0
बीड बायपास परिसरात पाणी प्रश्न सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, किशोर शितोळे यांच्या प्रयत्नांना यश

निशांत हॉटेल ते रेल्वे पटरी परिसरातील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या प्रयत्नांना यश

भाऊबीजेच्या दिवशी नागरिकांना दिलासा; पाण्याच्या टाकीला पाणी जोडण्यासाठीचे काम सुरू

बीड बायपास परिसराचा पाणीप्रश्न सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; रोड क्रॉसिंग पाइपलाइनचे काम सुरू

किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा; त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- बीड बायपास परिसरातील त्रिभुवनेश्वर मंदिर परिसर, सेनानगर, पीडब्ल्यूडी कॉलनी आणि राजगुरुनगर येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. या भागासाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला बीड बायपासवरून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या रोड क्रॉसिंग पाइपलाइनच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर दादा शितोळे यांच्या नेतृत्वाखाली या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

संबंधित भागातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी पाण्याची टाकी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांचा संबंधित यंत्रणांकडे नियमित पाठपुरावा केला जात आहे. कंत्राटदाराकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कामाला अपेक्षित गती मिळत नसली, तरी उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कामांचा पाठपुरावा करण्यात येत असून, बीड बायपासवरील निशांत हॉटेल ते रेल्वे पटरी या दरम्यानच्या त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांना लवकरच नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या कामासाठी भाजपचे नगरसेवक श्रीमती शोभाताई बुरांडे, श्रीमती सविता कुलकर्णी, श्री चंद्रकांत हीवराळे, श्री आप्पासाहेब हीवाळे, श्री पदम राजपूत, श्री प्रदीप बुरांडे आणि श्री विशाल थोरात हेही किशोर दादा शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करीत आहेत.

किशोर दादा शितोळे म्हणाले, "या परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लावणे हे आमचे प्राधान्य आहे. आज पाणी टाकीला पाणी घेऊन जाणारी पाइपलाइन चे रोड क्रॉसिंग पाइपलाइनचे काम सुरू झाल्याने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करून पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील."

भाऊबीजेच्या दिवशी या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow