कृषी विद्यापीठातील मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शुल्क सवलती, राजेंद्र दाते पाटील यांच्या आंदोलनाचे यश

 0
कृषी विद्यापीठातील मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शुल्क सवलती, राजेंद्र दाते पाटील यांच्या आंदोलनाचे यश

कृषी विद्यापीठांतील मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शुल्क सवलती सुरु...!

 राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्न त्याग आंदोलनाचे यश...

मुंबई, दि.21(डि-24 न्यूज)- राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयां मध्येइतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यां प्रमाणेच मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यां नाही शैक्षणिक शुल्क,परीक्षा शुल्क व अन्य शुल्कां मध्ये सवलती देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलीआहे. डॉ. राजेंद्र दाते पाटील यांच्या सोळा दिवसाच्या अन्न त्याग आंदोलनाचे यश असल्याचे स्पष्ट झाले असुन त्यांची या उपोषणातील महत्वाची मागणी होती कि, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक व नोकरी विषयक सवलती देतांना जी आर मध्ये दुरुस्ती करून केजी ते पीजी पर्यंत आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी समूहाला व नोकरीतील बढती साठी तसेच सर्वसाधारण वयो मर्यादा वाढ करून महिलांना 45 वर्षा पर्यंत मुभा देणारा सुधारीत अध्यादेश -शासन निर्णय काढावा त्याअनुषंगाने सुद्धा हा विजय म्हणजे जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्न त्याग आंदोलनाचे यश आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच मिळणार लाभ...

यासंदर्भाने कृषी विभागाने 20 नोव्हेंबर 2026 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले असुन राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णया मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासामिळणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने 5 जून 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतरमागासवर्गीय विद्यार्थ्यां प्रमाणेशैक्षणिक सवलती व सोयी- सुविधांचा लाभ शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अनुज्ञेय असल्या बाबतचे आदेश निर्गमित झाले आहे.

त्याच प्रमाणे जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांची अन्न त्याग उपोषणात मागणी होती कि, मागासवर्गीय प्रवर्गा तील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिक्षणशुल्कापेक्षा

अधिक शुल्क मराठा विद्यार्थ्यां कडून आकारण्यात

येऊ नये. तसेच, शुल्क न

भरल्यामुळे त्यांच्या प्रवेश

प्रक्रियेत कोणताही अडथळा

निर्माण होणार नाही, याची

दक्षता घेण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्वच आणि या विषयाशी संबधित सर्वच विभागांना देण्याचे अत्यंत गरजेचे होते. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या

शिक्षण संस्था व महाविद्याल

यांविरुद्ध नियमानुसार

कार्यवाही करण्याचेही निर्देश

राज्य शासनाने निर्गमित केले आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी व कृषी

संलग्न महाविद्यालयांमधील

इतर मागासवर्गीय प्रवर्गातील

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या

शैक्षणिक शुल्क, परीक्षा

शुल्क व अन्य शुल्क सवलती

मराठा समाजातील पात्र

विद्यार्थ्यांनाही लागू करण्यास

शासनाने मंजुरी दिली आहे.

या सवलतींमध्ये प्रवेश

शुल्क, विद्यापीठ विद्यार्थी

सहाय्य निधी- कल्याण निधी, कॉलेज मॅगेझीन फी,

विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, ग्रंथालय शुल्क, विद्यापीठ अश्वमेध निधी, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी व विद्यार्थी ओळखपत्र शुल्क यांचा समावेश आहे. महाराष्ट्र

कृषी शिक्षण व संशोधन

परिषद, पुणे यांच्या प्रवेश

पुस्तिकेत नमूद असलेल्या या दहा प्रकारच्या शुल्कांचा लाभ पात्र मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे.

या निर्णयामुळे जेष्ठ अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांचे प्रदीर्घ असे अन्न त्याग उपोषण आंदोलन यशस्वी ठरले असुन अंत्यन्त संयमाने केलेले हे उपोषण प्रथम पासूनच लक्ष वेधून घेत असल्यामुळे कायदेशीर व घटनात्मक तरतुदीच्या मागण्या शासन मंजुर करते हे जेष्ठ अभ्यासक यांच्या दृढ अन्न त्याग आंदोलनाने सिद्ध झाल्याची सर्व दुर चर्चा मात्र निश्चित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow