औरंगाबाद नामांतर, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
औरंगाबाद नामांतर, न्यायालयाने सरकारला फटकारले
औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरावर 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी, औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गाव, उस्मानाबाद जिल्हा तालुका गाव नामांतरावराचा निर्णय राखीव
मुंबई, दि.12(डि-24 न्यूज)
आज दुपारी तीन वाजता मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरावर पुन्हा सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय व न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयात प्रकरण सुरू असताना विविध शासकीय विभागात नावे बदलण्याचे आदेश काढले जात आहे असे याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांचे वकील एस.एस.काझी यांनी निदर्शनास आणून दिले याबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले.
काझी यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शैक्षणिक विभागाने आगामी वर्षाच्या पाठ्यपुस्तक छपाईबाबत शालेय पुस्तकात या दोन शहराचे नविन नावे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्याचे आदेश काढले आहेत. अजून नामांतरावरावर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकार मनमानी करत आहे. न्यायालयाने अॅड काझी यांची सूचना वर प्रतिक्रिया देत याबाबत अधिवक्ता सराफ यांना याबाबत न्यायालयाने फटकारले. नामांतरावरावर अजून निर्णय आलेला नाही. नामांतरावर विरोधात निर्णय आल्यास जनतेचे पैशांचा अपव्यय केला जात आहे हा न्यायालयाचे अवमान आहे. पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे यानंतरच निर्णय येण्याची शक्यता आहे. सर्वांचे डोळे या निर्णयाकडे लागले आहे.
यावेळी याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांचे वकील अॅड युसुफ मुशाला, मोहम्मद हीशाम उस्मानी यांचे वकील अॅड एस.एस.काझी यांचे जूनियर अॅड शेख मोईन तर उस्मानाबाद नामांतर विरोधात अॅड सतिश तळेकर उपस्थित होते.
What's Your Reaction?