जालन्याचे खासदार डॉ, कल्याण काळे अडकले दुबईत पण सुरक्षित, छत्रपती संभाजीनगरचे दहा जण सुरक्षित...

 0
जालन्याचे खासदार डॉ, कल्याण काळे अडकले दुबईत पण सुरक्षित, छत्रपती संभाजीनगरचे दहा जण सुरक्षित...

जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे अडकले दुबईत, छत्रपती संभाजीनगरचे दहा जण सुरक्षित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - इज्राईल-अमेरीका व इराण युद्ध सुरू आहे. आखाती देशात भारतीय नागरिक सुद्धा अडकले आहेत. या युध्दाचा परिणाम आखाती देशावर पडत आहे. इराणने दुबईसह विविध शहरांतील अमेरिकेच्या लष्करी तळांना व महत्वाच्या इमारतींना लक्ष केले आहे. या युद्धजन्य परिस्थितीत जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहा जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. देशातील व राज्यातील हजारो नागरिक या युध्दात अडकले आहेत त्यांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर येथील दोन कुटुंबे व पुण्यातील सहलिला गेलेले 80 विद्यार्थी दुबईत अडकले आहेत. खासदार डॉ कल्याण काळे हे पुर्व नियोजित दौऱ्यावर दुबईत परिवारासह गेले आहे. त्यांनी फेसबुक पेज वर सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. सुरक्षिततेबाबत चिंता करण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांची व हितचिंतक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 

छत्रपती संभाजीनगर येथील दहा जण सुरक्षित आहे. यामध्ये एन-2 सिडको येथील डॉ. प्रितम वाल्मिक शेलार, चि.आर्य प्रितम शेलार, चि.शौर्य प्रितम शेलार, डॉ.हर्षदा प्रितम शेलार हे हाॅटेल आवरी, दुबईत तर एन-1 सिडको येथील प्रमोद काळे, श्रीमती उषा काळे, चि.पृथ्वीराज काळे, चि.भुषण काळे, हे कैरो इजिप्त येथे आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नितीन चिचाणी, श्रीमती कल्पना चिचाणी हे क्रीक हर्बर पाॅवर - 18 A दुबईत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व संपर्कात आहे व सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिली आहे. 

नागपूरच्या चिकटे आणि घोरफेंडे कुटुंबातील 9 सदस्य सध्या दुबईत अडकले आहेत. इराण-इज्राईल युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या प्रवाशांना 3 मार्च रोजी मायदेशी परतायचे होते. मात्र दुबई विमानतळ अचानक बंद करण्यात आल्याने प्रवासी अडकले आहेत. मिसाईल हल्ल्यांच्या दहशतीमुळे या पर्यटकांना हाॅटेलबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. हाॅटेल प्रशासनाच्या वतीने निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जात आहे. या संकट काळात आपल्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या कुटुंबाने केंद्र व राज्य सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow