काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात...!

 0
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात...!

संघटन सृजन अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी घेतला पदभार. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार, प्रा. विशाल पतंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या निर्धारासह आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील शेकडो पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान वाचन करून सुरुवात करण्यात आली.  

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी संघटना विस्तार, सदस्य नोंदणी, बूथ सक्षमीकरण आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाला अधिक सक्षम बनविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी देत अनुभवी आणि युवा कार्यकर्त्यांचा समतोल साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर म्हणाले की काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक काम करण्यात येईल. बूथ स्तरापासून शहर पातळीपर्यंत मजबूत रचना उभारून युवक, महिला, कामगार, व्यापारी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि सर्व समाजघटकांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे आणि जनहिताच्या विषयांवर संघर्ष उभारणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम केले जाईल.

या प्रसंगी खा. डॉ. कल्याण काळे, प्रदेश प्रवक्ता हनुमंत पवार, प्रा. विशाल पतंगे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, प्रदेश पदाधिकारी विलास औताडे, NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, कमाल फारुकी, ॲड. संदीप ढवळे, अशोक डोळस, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, इक्बालसिंग गिल, डॉ. सरताज पठाण, भाऊसाहेब जगताप, खालेद पठाण, राजेश मुंढे, दीपा मिसाळ, डॉ. निलेश आंबेवाडीकर, डॉ. पवन डोंगरे, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, सागर नागरे, विश्वास औताडे, अभिषेक शिंदे, मोईन कुरेशी, गुलाब पटेल, महेंद्र रमंडवाल, अफजल कादरी, शेख अथर, शेख कैसर बाबा, मोईन इनामदार, अनिस पटेल, योगेश थोरात, मोहम्मद जाकेर, इंजि. इफ्तिकार शेख, सूर्यकांत गरड, डॉ. अरुण शिरसाट, संजय धर्मरक्षक, अकिल पटेल, मुकेश सोनवणे, शेख अब्दुल रईस, निमेश पटेल, हसण्योद्दीन कट्यारे , प्रतीक पाटील, साहेबराव बनकर, दीपक खनसे पाटील, सलीम खान, शेख फयाजोद्दीन, मुजाहेद पटेल, अल्ताफ पटेल, दीक्षा पवार, अनिता भंडारी, शीला मगरे, सुनीता पानाकडे, सुनीता निंबाळकर, बरखा विंचुरे, चंद्रप्रभा खंदारे, सोफिया बेगम, शेख जमील, नदीम सौदागर, साजेद कुरेशी, मुदस्सिर अन्सारी, अस्मत खान, डॉ. योगेश बहादुरे, सचिन शिरसाट आदी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेचा गौरव करत . पक्ष संघटनेची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पदग्रहण सोहळ्यामुळे शहर काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी काळात संघटना अधिक मजबूत आणि जनसामान्यांशी जोडलेली राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात आला.

काॅकरोज पार्टी राहुल गांधी यांचा एजंडा राबवित आहे - खासदार डॉ कल्याण काळे 

किरण पाटील डोणगावकर, ॲड.अक्रम यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न...

क्रॉक्रोच जनता पार्टीने (CJP) नीप पेपरफुटीप्रकरणी केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, हा अजेंडा घेऊन ते उतरले आहेत, मात्र हा अजेंडा आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आधीच घेतलेला आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी आधी त्यांनीच केली आहे. त्याच मुद्यावर एनएसयूआय, युवक काँग्रेसने आणि सगळ्या पक्षांनी घेतला, त्यानंतर आता ते उतरले आहेत. राहुल गांधी यांची मागणीच त्यांनी रेटून धरली आहे. त्यामुळे आम्हांला त्याची काही अडचण नाही असे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शहागंजमधील गांधी भवनात सोमवारी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी काँग्रेस नेत्यांनी संवाद साधला. यावेळी खा.काळे, प्रवक्ते हनुमंत पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष डोणगावकर, ॲड. अक्रम, सागर साळुंके आदींची उपस्थिती होती. 

खा. काळे म्हणाले की, संविधान वाचविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून आम्ही उतरलो असल्याचे क्रॉक्रोच जनता पार्टी (CJP) सांगत आहे. ते निवडणूका लढणार आहेत की नाही, संघटन बांधायचे आहे की नाही, याबद्दल त्यांनी काही स्पष्ट केलेले नाही. सेक्युलर मतांची विभागणी होणार नाही, याची काळजी सर्वांना घ्यावी लागेल. यावेळी त्यांनी विविध विषयावर भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी न बोललेले बरे, असा टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांना लगावला. प्रवक्ते पवार यांनी एसआयआर मोहिम आणि मतदारांना सहकार्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होणारे सहकार्य याबद्दल माहिती दिली. 

2029 ला जनताच बदल घडवून आणणार....

1978 ला काँग्रेस झिरो झाली होती, पुन्हा उभारून आली. तीच परिस्थिती पुन्हा एकदा देशात आहे, परंतू त्यावेळी काँग्रेसवर एवढे आरोप नव्हते, जेवढे आज भारतीय जनता पक्षावर आहेत, भाजपच्या पंतप्रधानावर आहेत. देशातील जागरूक जनता पुन्हा एकदा 2029 ला बदल घडवून आणेन. त्यासाठी आमच्यातील जो संघटनेला ताकद देण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरू केले आहे. वेगवेगळ्या राज्यात त्याचे चित्र दिसत आहे. पुढील काळात काँग्रेस पुन्हा एकदा नव्याने उभारून आलेली दिसेल असेही खासदार डॉ

कल्याण काळे पुढे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow