स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निघणार भव्य तिरंगा यात्रा, जय्यत तयारी सुरू
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निघणार भव्य तिरंगा यात्रा, जय्यत तयारीला वेग...
छत्रपती संभाजीनगर, दि.11(डि-24 न्यूज)- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची या यात्रेला विशेष उपस्थिती राहणार आहे. दुपारी 2 वाजता महात्मा फुले पुतळा, संभाजीपेठ येथून तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, पैठण गेट, नूतन कॉलनी मार्गे क्रांती चौक (देवगिरी बँकेजवळील तिरंगा ध्वज) येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
या पार्श्वभूमीवर तिरंगा यात्रेच्या नियोजित मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि महापालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मार्गाची पाहणी करून यात्रेच्या विविध व्यवस्थांचा आढावा घेतला.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या तिरंगा यात्रेला भव्य स्वरूप देण्यासाठी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनाला वेग आला असून, विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संपर्क आणि जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या तिरंगा यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तिरंगा गौरव समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी दि
ली आहे.
What's Your Reaction?