हर्सुल जेल-जटवाडा रोड चौकात वाहतूक सिग्नल बसवण्याची मागणी....

हर्सुल जेल – जाटवाडा रोड चौकात सिग्नल बसविण्याची मागणी...
राइट्स ऑफ सिटीझन्स इन डेमोक्रॅटिक इंडियाचे अध्यक्ष अन्वर कादरी यांची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)– हर्सुल जेल – जाटवाडा रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F वर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या चौकात सिग्नल प्रणाली नसल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राइट्स ऑफ सिटिझन्स इन डेमोक्रॅटिक इंडिया या संस्थेचे अध्यक्ष अन्वर कादरी यांनी पोलिस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या चौकातून समृद्धी महामार्ग, ओव्हर जाटवाडा, हर्सुल, सावंगी आणि इतर निवासी भागांना जोडणारे रस्ते जात असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सिग्नल नसल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी शाळा व कार्यालयाच्या वेळात वाहतूक कोंडी होते आणि अपघातांची शक्यता वाढते.
म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या ठिकाणी त्वरित वाहतूक सिग्नल प्रणाली बसवावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
अन्वर कादरी यांनी सांगितले की, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलल्यास परिसरातील नागरिक आणि प्रवासी यांना मोठा दिलासा मिळेल.
What's Your Reaction?






