महापालिकेचे 18 अधिकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त

महापालिकेचे 18 अधिकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त...
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि 1(डि-24 न्यूज);
आज दिनांक 31 जानेवारी रोजी महानगरपालिकेतील वर्ग एक ते तीन या संवर्गातील 3 अधिकारी आणि वर्ग चार संवर्गातील 15 कर्मचारी असे एकूण 18 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
याचात सहाय्यक अभियंता झोन-5 आतिफुद्दीन कादरी, अधीक्षक घनकचरा विभाग जयवंत कुलकर्णी आणि शिक्षण विभागातील किरण परदेशी यांचा समावेश आहे.
यानिमित्त त्यांच्या गौरव आज महापालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहूळे, उपायुक्त राहुल सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त स्थापना अभय प्रामाणिक, मलेरिया ऑफिसर डॉक्टर अर्चना राणे इत्यादी यांची अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जी श्रीकांत म्हणाले की आपण सर्वांनी किमान 30-30 वर्ष महापालिकेची सेवा केली याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार. ते पुढे म्हणाले की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पैसे आम्ही ज्येष्ठता यादी नुसार देण्याचे प्रयत्न करत आहोत. महापालिकेची सध्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की पुढच्या महिन्यापासून हजेरी ॲप नुसारच पगार होणार आहे. या महिन्याची पगार देखील एपनुसारच करायची होती पण उद्या पगार होतोय. याला सर्वांनी शेवटची संधी म्हणून यापुढे हजेरी ॲप वर हजेरी लावणं गरजेचे आहे त्याशिवाय पगार होणार नाही ते म्हणाले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जयवंत कुलकर्णी आणि अशोक हिवराळे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गौरव केल्याबद्दल आयुक्त यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांचे अनुभव सांगि
तले.
What's Your Reaction?






