शहरात पुन्हा पैठण गेट येथून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू, 118 दुकाने निष्कासित...
पैठण गेट सबजी मंडी येथे 118 दुकानी निष्कासित
उद्या मिटमिटा येथे गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि 19(डि-24 न्यूज)-
आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा पैठण गेट येथून अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे.
मोबाईल मार्केट मध्ये एक खूनाची घटना घडली होती त्यानंतर मनपाने अनधिकृत दुकानांवर कारवाई मार्कींग केल्यानंतर सुरू केली. आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार, पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी उपलब्ध करून दिलेल्या पोलीस अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत
पैठण गेट सबजी मंडी परिसरात आणि क्रांती चौक ते पैठण गेट पर्यंत केलेल्या कारवाईत एकूण 118 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, शेड, गॅरेज, फलक, साईन बोर्ड इ. निष्कासित करण्यात आले.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 10 जेसीबी, 2 पोकलॅन, 10 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 5 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे, कार्यकारी अभियंता (यांञिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त अतुलकर, मनपा सहायक आयुक्त सविता सोनवणे, अशोक गिरी,
रमेश मोरे, सय्यद समीउल्लाह, भारत बिरारे, नईम अन्सारी, अतिक्रमण समनव्य अधिकारी संजय सुरडकर व इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सय्यद जमशेद, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सुरज सवंडकर, राहूल मालखेडे, शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते.
उद्या गोल्फ मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई...
उद्या मिटमिटा भागात गोल्फ मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संतोष वाहूळे यांनी यावेळी दिली. या रस्त्यावरील अतिक्रमण, बाधित मालमत्ता नागरिकांनी स्वतः काढून मनपाशी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावे
ळी केले आहे.
What's Your Reaction?