खरंच बहीण लाडकी असेल तर तिच्या मुला मुलींसाठी खोकडपु-यात सिबिएसई शाळा सुरू करा

 0
खरंच बहीण लाडकी असेल तर तिच्या मुला मुलींसाठी खोकडपु-यात सिबिएसई शाळा सुरू करा

खरच बहीण लाडकी असेल तर तीच्या मुला मुलींसाठी मनपा खोकडपुुरा शाळेची इमारत बांधुन मोफत सीबीएसई शाळा सुरु करा ! - भाकप 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) खोकडपुरा येथील येथील बंद पडलेल्या मनपा शाळेच्या इमारतीच्या ठिकाणी चांगली मजबूत बहुमजली इमारत बांधून महानगरपालिकेची शाळा(सीबीएसई )त्याच ठिकाणी सुरू करा, बापूनगर लाल मशिदीसमोरील बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर लग्नकार्यासाठी सभागृह बांधा, गांधीनगर रविवार बाजारच्या महानगरपालिकेच्या जुन्या शाळेच्या जागेवर बहुमजली सीबीएससी शाळा बांधा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे झालेल्या निदर्शनाने मनपा परिसर दणाणून गेला. 

या बाबत असे की, गांधीनगर, बापू नगर, खोकडपुरा हा संपूर्ण परिसर कष्टकऱ्यांचा परिसर आहे. गांधीनगर रविवार बाजार जवळ महानगरपालिकेची मोठी शाळा होती. ती मुद्दामहून बंद पाडण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आपल्या मुलांना खाजगी शाळेत प्रवेश घ्यावा लागला आणि त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खाजगी शाळा मोठमोठी फीस घेऊन पालकांना लुटत आहेत.

महानगरपालिका वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स घेते आणि कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देत नाही. हे योग्य नाही त्यामुळे गांधीनगर रविवार बाजार जवळील महानगरपालिकेच्या जुन्या शाळेच्या जागेवर आता सीबीएससीची शाळा सुरू झाली पाहिजे. त्या ठिकाणी बहुमजली इमारत बांधली पाहिजे असे भाकपच्या निवेदनात मागणी आहे. त्याचबरोबर लाल मशीद समोर गांधीनगर येथे बंद पडलेले सार्वजनिक शौचालय आहे त्या ठिकाणी स्वच्छता ही केली जात नाही, शौचालय बंद आहे, त्या ठिकाणीची जागा पडीक आहे. त्या ठिकाणी नागरिकांसाठी लग्नकार्यासाठी, वेगवेगळ्या समारंभासाठी सभागृह बांधले तर नागरिकांचे पैसे वाचतील.

             त्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक सभागृह बांधण्यात यावं त्याचबरोबर मनपा प्राथमिक शाळा खोकडपुरा इमारत देखील मोडकळीस आल्यामुळे ती बंद पाडलेली आहे. त्या ठिकाणी पुन्हा इमारत बांधून त्या ठिकाणी सीबीएससीची शाळा सुरू करण्यात यावी. त्याठीकाणी दारुड्यांंचा अड्डा होऊ लागला आहे, असा ऐकण्यात आलं आहे या सगळ्या जमिनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे झाले तर सत्ताधारी पक्षाला येत्या निवडणुकीत त्याची मोठी किंमत चुकावी लागेल असा इशाराही परिसरातील नागरिकांतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना दिला आहे. प्रशासक म्हणून आणि महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून या सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देण्यात आला आहे. शाळांची सोय करा मनपाचे भूखंड कोणाच्यातरी घशात घालण्याचे षडयंत्र आखु नका असा इशारा देखील निवेदनात नमूद आहे. शिक्षण आमच्या हक्काच, खोकडपुरा मनपा शाळा बांधलीच पाहिजे, खरच बहीण लाडकी असेल तर तीच्या मुला मुलींसाठी मनपा खोकडपुुरा शाळेची इमारत बांधुन मोफत सी बी एस ई शाळा सुरु करा ईत्यादी घोषणांनी मनपा परिसर दणाणून गेला. 

मुजोर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अनुपस्थित! निवेदन रिकाम्या खुर्चीला ! 

 मनपा आयुक्त जी श्रीकांत नेहमीप्रमाणे अनुपस्थित होते, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील निवेदन न घेता निघुन गेले, संविधान, लोकशाही न माननारी भाजपा शिंदे गट सत्तेत असल्याने आयुक्तांची हुकुमशाही वाढली आहे, यांना 24% व्याज लावुन जनतेकडून टॅक्स घ्यायला गोड वाटत, लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार्‍यांचा सन्मान न करण्याची प्रवृत्ती बळावत चालली आहे, ज्याच्या जीवावर आयुक्त मुजोरी करत आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करुत असेही ही भाकपचे अभय टाकसाळ म्हणाले. या निदर्शनात अँड अभय टाकसाळ शहर सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँ. अनिता हिवराळे शहर सह सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँ. राजू हिवराळे, काॅ रफिक बक्ष, विकास गायकवाड, शेख वसीम, सलीम खामगावकर, कॉ. जफर फजलू रहमान, भिमबाई गायकवाड, शमा बागवान, अरुणा गायकवाड, दिपाली दाभाडे, मुनाबी शेख बुडन, कडुबाई बनसोडे, रजिया बेगम, रंजना बनसोडे , रेखा नरवडे, शालुबाई कांबळे, पुष्पाबाई बिरारे, शिलाबाई दिवे, मीना जाधव, शिला प्रधान, कमल कीर्तीशाही, नंदा वखरे, कडुबाई कांबळे, रेखा अंभोरे, सुरेखा गवळे, शोभा जाधव, मनिषा जावळे, सय्यद मुबारक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow