स्पर्धेच्या युगात गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याची गरज - अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे

 0
स्पर्धेच्या युगात गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याची गरज - अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे

स्पर्धेच्या युगात गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याची गरज - अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे

स्व. प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे खेळाडू अदिती तळेगावकर हिस 51 हजार रूपयांची मदत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज) - अनेकदा गुणवंत आणि गरजू खेळाडू हे साधने, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहितीसह प्रशिक्षकाअभावी स्पर्धेत कमी पडतात. पूर्वी संस्थानिक आणि दानशूर व्यक्ती अशा खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करत विजयापर्यंत पोहचत होते. आजही ग्रामीणसह शहरी भागात स्पर्धेच्या युगात गुणवंत खेळाडूंना पाठबळ देण्याची गरज असल्याची भावना घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केली. बेगमपूरा भागातील व शहरातील अनेक खेळांडूचा गौरव स्व. प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला, त्यावेळी डॉ. सुक्रे बोलत होते. जिम्नॅस्टिक खेळाडू अदिती तळेगावकर हिस 51 हजार रूपयांची मदतही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.

यावेळी बॉस्केटबॉलपटू कु. केतकी ढंगारे, कुस्तीपटू चि. प्राजंल बरेटिये या दोन खेळांडूनां डॉ. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दत्तक घेत जबाबदारी घेतली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून या खेळांडूना सर्वर्तोपरी मदतीचे आश्वासन डॉ. सुक्रे यांनी दिले. भारतीय जिम्नॅस्टिक संघ दक्षिण कोरियाला दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रवाना होत असून, त्या संघातली छत्रपती संभाजीनगरची खेळाडू आदिती तळेगावकर हिला प्रभाकर पांडे प्रतिष्ठान तर्पेâ 51 हजार रुपये मदत पांडे स्पोर्ट्स पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुक्रे, छत्रपती पुरस्कार विजेते विजय पाथरीकर, गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी महापौर अशोक सायन्ना यादव, सतिश चौधरी, प्राचार्य मकरंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच गिरीश गोडबोले या सायकलपटूसह तिसगावची आंतरराष्ट्रीय खेळाडू जुडोपटू, श्रद्धा चोपडे हिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. हनुमान व्यायाम शाळेचे मल्ल यांची निवड चंदिगड येथे होणार्‍या आंतर-विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचा तसेच प्रशिक्षक डॉ. प्राध्यापक हंसराज डोंगरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू खेळाडू केतकी डंगारे, जलतरणामध्ये चेन्नई येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झालेले हरी सांगळे आणि अमृता निरंजन पांडे, विश्वेश जोशी, ऋतूजा गायकवाड या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी स्व. प्रभाकर पांडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. आशुतोष डंख, सचिव प्रमोद झाल्टे, कोषाध्यक्ष विनायक पांडे, प्राचार्य फुलचंद सलामपुरे, जनार्धन भडके, राजेंद्रसिंग प्रदीप सोहोनी, विलासआप्पा संभाहारे, संदेश वाघ, विजय पुंड, दीपक कनिसे, सिताराम पहाडी, पूनमचंद चौधरी, परमेश्वर जैस्वाल, सुंदरलाल खरे, मुकुंद कुलकर्णी, अ‍ॅड. एडवोकेट निरंजन पांडे, धीरज पांडे, मदन नंदवनसिंग, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव, संतोष गुजराती, गणेश जोगळे, राजू जाफराबादी, संजय फतेलष्कर, गिर्यानंद भगत, संजय भातावाली, नंदू जोशी, सुदेश डोंगरे, संदेश डोंगरे, सुनील बागवाले आदी क्रिडाप्रेमी नागरिक व खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाडूंच्या मदतीसाठी प्रतिष्ठान

सदैव प्रयत्नशील - अ‍ॅड. आशुतोष डंख

स्व. प्रभाकर पांडे प्रतिष्ठानने यापुर्वी दहा खेळांडूना दत्तक घेतले असून, त्यांना दरमहा खानपान (खुराक) यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच स्पोर्टस साहित्य, कपडे, बूट आदी साहित्य मोफत पुरविले जाते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक व्हावा, यासाठी प्रतिष्ठान सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. आशुतोष डंख यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow