महापुरुषांच्या स्मारकांची केली स्वच्छता, खो-खो, कबड्डी स्पर्धा यशस्वी
महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, खो-खो, कबड्डी स्पर्धा यशस्वी
छ. संभाजीनगर(औरंगाबाद ), दि.9(डि-24 न्यूज) शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढवा या उद्देशाने सोमवारी (दि.9) शहरातील विविध भागात महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संभाजी पेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर 17 वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य कबड्डी तसेच खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या उदघाटन उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, गणेश पवार, कार्याध्यक्ष संदीप शेळके, अनिकेत पवार, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुलांच्या कब्बडी संघात बळीराम पाटील विद्यालय प्रथम, तर उपविजेता म्हणून जयहिंद विद्यालयाने पारितोषिक पटकवले, तर मुलींच्या कबड्डी स्पर्धेत भराडी येथील ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय प्रथम तर डॉ. डी. पी पाटील विद्यालय उपविजेता ठरला. 17 वर्षाखालील या कबड्डी स्पर्धेचे पंच म्हणून पंच प्रमुख डॉ. माणिक राठोड, गणपत पवार, ज्ञानेश्वर सावंत, अल्केश चव्हाण, कृष्णा पवार, शुभम हातोळे, योगेश चव्हाण, क्रीडा शिक्षक करण लघाने, जावेद पठाण, विठ्ठल शेळके यांनी काम पाहिले. या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील 18 संघांनी आपला उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. तर खो खो स्पर्धेत जिल्ह्यातील मुलांच्या 13 तर मुलींच्या 14 संघांनी आपला उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे खजिनदार गोविंद शर्मा यांच्या मार्गदर्शनात दीपक सपकाळ, सचिव विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे, राहुल नाईकनवरे, वरद कचरे, अनिकेत मालोदे, सूरज चिरमाडे, रोहित बोर्डे, यश मोरे, योगेश भोगे यांनी काम पाहिले. 17 वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम बाला नगर येथील स. भु. प्रशाला, द्वितीय आ.कृ. वाघमारे प्रशालेने पारितोषिक पटकवाले तर मुलांच्या खो-खो स्पर्धेत प्रथम कांचनवाडी येथील राजे संभाजी सैनिकी शाळा तर द्वितीय पारितोषिक राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाने पारितोषिक पटकावले विजेत्या स्पर्धाकांना अनुक्रमे प्रथम 7 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तर द्वितीय संघास 5 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे गोविंद शर्मा, अभयकुमार नंदन, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख राजेश कसूरे,अमोल सोमवंशी अजिंक्य सुरळे, सौरभ यादव, सौरभ साळुंके, यांची उपस्थिती होती.
या स्पर्धाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र दाते पाटील, किशोर तुळशी बागवाले, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, निखिल चव्हाण, अनिल सोनवणे, विनायक वेंन्नम, मयूर जाधव, राजू मन्सूरी, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, यांची उपस्थिती होती. प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संजय राखूडें, सुमित दंडुके यांनी पुढाका
र घेतला.
What's Your Reaction?