जिल्हास्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेस शानदार सुरुवात

जिल्हास्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेस शानदार सुरुवात...
मुलींच्या गटातून नाथ व्हॅली स्कूल फ्रान्सिलियन स्कूल , गुरुकुल ओलंपियाड, एस बी ओ ए स्कूल, एमजीएम क्लोवरडेल स्कूल, रिव्हरडेल स्कूल, वूड रिच स्कुल या संघांची उपउपांत्य फेरीत धडक
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिका ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्वाभिमान क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने सिडको एन-3, येथील बास्केटबॉल कोर्ट वरती मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेस शानदार सुरुवात झाली आहे.
यावेळी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेचे उदघाटक, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, माजी नगरसेविका श्रीमती माधुरी अदवंत, मनपा उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे,मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालया ,जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष गणेश कड, स्पर्धा प्रमुख पंकज परदेशी, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते बॉल रिंगमध्ये टाकून व नारळ फोडून स्पर्धेचे औपचारिक उदघाटन करण्यात आले.
स्पर्धेची सुरुवात 17 वर्ष वयोगटांच्या मुले व मुलींच्या सामन्याने करण्यात आली. यावेळी 17 वर्ष वयोगटातून 32 मुलांच्या व 30 मुलींच्या संघांचा सहभाग असून स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली जाणार आहे.ही संपूर्ण स्पर्धा पूढील पाच दिवस चालणार आहे.
तसेच, आज झालेल्या सामन्यांमधून, 17 वर्षा आतील मुलांच्या गटातील बास्केटबॉल स्पर्धेमध्ये अनुक्रमे एमजीएम ग्लोबल स्कूल, मुकुल मंदिर स्कूल, एस अकॅडमी स्कूल, फ्रान्सलिअन स्कूल, वाय एस खेडकर गुरुकुल ओलंपियाड, अग्रसेन विद्या मंदिर यांची विजय घोडदौड सुरू असून,
मुलींच्या वयोगटात, नाथ व्हॅली स्कूल फ्रान्सिलियन स्कूल , गुरुकुल ओलंपियाड, एस बी ओ ए स्कूल, एमजीएम क्लोवरडेल स्कूल, रिव्हरडेल स्कूल, वूड रिच स्कुल या संघांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली असल्याचे, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष गणेश कड, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बाल्लय्या व स्पर्धा प्रमुख पंकज परदेशी यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?






