वाळूज गटातून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी विजयश्री खेचून आणली...
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के
यांनी जि. प. वाळूज गटातून मिळविली 'विजयश्री'
वाळूज ठाण्यातील उल्लेखनीय कामगिरीचे फळ
छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) -सेवाननिवृत्त सहायक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मधील वाळूज गट (39) मधून विजयी झाले आहेत. सोनटक्के मराठवाडा पोलिस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह पोलिस दल आणि मित्रपरिवारांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बालाजी सोनटक्के मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, पोलीस दलातील त्यांचा बहुतांश सेवाकाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यतित झाला. प्राप्त माहितीनुसार बालाजी सोनटक्के 1991 च्या बॅचचे पी. एस. आय. असून, त्यानंतर ते पोलीस निरीक्षक (पी. आय.) झाले. पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयाअंतर्गत पिशोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणूनही त्यांनी यशस्वी कार्यभार सांभाळला. शहरात क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मध्यंतरी काही काळ लातूर जिल्ह्यात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणूनही सोनटक्के यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
अनेक गुन्ह्यांचा छडा
पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये यशस्वी कर्तव्य बजावतानाचा नगर जिल्ह्यातील एका बलात्कारासह दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्याची उल्लेखनीय कामगिरी सोनटक्के यांनी केलेली आहे. सोनटक्के यांचा महाराष्ट्रातील पारध्यांच्या टोळ्यांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना ते अटक करू शकले. नगर जिल्ह्यातील हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले होते.
काही काळ वाळूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणूनही बालाजी सोनटक्के यांची कारकीर्द चांगलीच गाजली. वाळूजमध्ये त्यांनी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून गुन्हेगारांना गजाआड केले होते. वाळूज पालीस ठाण्याअंतर्गत बारा-पंधरा गावे येतात. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार तसेच सर्व नागरिक सोनटक्के यांच्या कामगिरीवर जाम खूश असल्यामुळेचे सोनटक्के यांना जि. प. निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याचे बोलले जात आहे. जि. प. निवडणुकीत विजयी झाल्याच्या प्रीत्यर्थ 22 फेब्रुवारी बालाजी सोनटक्के यांचा मराठवाडा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दिगंबर गाडेकर आणि सेवानिवृत्त उपअधीक्षक रामनाथ चोपडे यांनी दिली.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून त्यांना वाळूज गटाकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांनी विजयश्री खेचून आणल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मतदारांनी प्रचंड विश्वास दाखवत निवडून दिले. सेवा करण्याची संधी दिली. हि निवड केवळ पदाची नाही. वाळूजच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाला गती देणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि सहभागातून वाळूज गट अधिक सक्षम व सुंदर बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. मतदारांच्या आशिर्वादाने झालेला हा प्रवास पारदर्शक, कार्यक्षमता आणि जनहिताच्या मार्गावर सदैव समर्पित राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ग्रामीण विकासाला बळ... !
सहायक पोलीस निरीक्षक संतोष बडे यांनी नोकरीचा राजीनामा देवून समर्थनगर प्रभागातून महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात ते पराभूत झाले. सोनटक्के यांनी सेवानिवृत्तीनंतर जि. प. निवडणूक लढविली आणि त्यात पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. मागे 2014-2015 मध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जेम्स अंबिलढगे काँग्रेसच्या तिकिटारवर छावणी-नंदनवन कॉलनीतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सिल्लोड तालुक्यातील पालोद गटातून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) देवीदास पालोदकर हे देखील जि. प. गटातून विजयी झाले आहेत. पालोदकर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. शासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी जि. प. वर निवडून गेल्यामुळे ग्रामीण विकास कार्याला अधिक गती मिळेल असे बो
लले जात आहे.
What's Your Reaction?