अपक्ष उमेदवाराने शिंदे सेनेचा तगडा उमेदवार पाडला, सचिन गरड यांचा एका मताने विजयी...
अपक्ष उमेदवाराने शिंदे गटाचा तगडा उमेदवार पाडला, सचिन गरड यांचा एका मताने विजयी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकाल जाहीर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त एका मतामुळे राजकारण बदलले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी वडगाव कोल्हाटी गटातून शिंदे गटाच्या उमेदवाराचा एका मताने पराभव केल्याने धक्का बसला. एक मताने जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या या अपक्ष उमेदवाराची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.
संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात लागलेला निकाल सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. वडगाव कोल्हाटी गटात भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा एक मतांनी विजय झाला आहे. सचिन गरड यांनी शिंदे गटाचे हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला आहे.
एक मताने निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. वाळू माफियांच्या आणि ताकदवार उमेदवारांच्या विरोधात लढलो जनतेने मी सामान्य असतांनी निवडून दिले त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली. झालेला पराभव मान्य करतो, एक मताने की होईना पराभव असतो आणि त्या एका मताची आज किंमत कळली अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली.
What's Your Reaction?