शहरात वाढली गुन्हेगारी, अवैध धंदे, कारवाई करा अन्यथा शिवसेना काढणार मध्यरात्री मशाल मोर्चा...!
शहरात गुन्हेगारी वाढली, कठोर कारवाई करा...
अन्यथा... शिवसेनेच्या वतीने मध्यरात्री मशाल मोर्चा
शिवसेना शिष्ठमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) मराठवाड्यासह खान्देश, विदर्भासह अनेक जिल्ह्यांतून शहरात अनेक जण उदारनिर्वाह असो मुलांचे शिक्षणांसाठी स्थायिक झाले. यामुळे सुरळीत असलेल्या या शहराला काहीजण अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर पोलीस प्रशासन म्हणून कठोर कारवाई करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने मध्यरात्री 12 वाजता विशाल मशाल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. क्रांतीचौक ते श्रीसंस्थान गणपती मंदीर, राजाबाजार दरम्यान मशाल मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध करणार असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
निवडणूकीमुळे पोलीस प्रशासनावर जास्त भार असल्याने त्याकाळात नागरिकांनी समजून घेतले. मात्र निवडणूका होऊन 20 नोव्हेंबरनंतर पंधरा दिवसात चार ते पाच खून, दरोडे, चोर्या वाढल्या आहेत. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, अवैध धंद्यामुळे तरुणात व्यसनाधिनता वाढली. याचे मुळ कारण अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि गुटखा यांचे चोरी छुप्या पद्धतीने व्यवहार सुरु आहेत. त्याला कुणाचा पाठींबा आहे का..? याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्लॉटींग व्यवयासात फसवणूक, कब्जा मारणे, नागरी वसाहतीत चोर्यांचे प्रमाण, वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याने पोलिसांचा धाक नसल्याचे समोर येत आहे त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना सुखाचे जीवन जगू द्या, असे आवाहन शिवसेनेने पोलिसांना केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, आशा दातार, दुर्गा भाटी, नलिनी बाहेती, सुनीता औताडे, महानगरसंघटक सुकन्या भोसले, मिरा देशपांडे, शिवअंगण वाडी सेनेच्या रेणुका जोशी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, हिरालाल सलामपूरे, किशोर कच्छवाह, राजू इंगळे, विजय वाघमारे, संतोष खेंडके, अॅड. चंद्रकांत गवई, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, सुभाष शेजवळ, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, अनिल जैस्वाल, संदेश कवडे, जयसिंग होलिये, संजय हरणे, कान्हुलाल चक्रनारायण, प्रमोद ठेंगडे, प्रितेश उर्फ बंटी जैस्वाल, शेख रब्बानी, नारायण जाधव, दिनेश राजे भोसले, नंदू लबडे, विष्णू कापसे, किरण गणोरे, दिनेश तिवारी, नाथा वखरे महिला आघाडीच्या उपशहरसंघटक प्रतिभा राजपूत, सुचिता आंबेकर, अॅड. अंजना गवई, लता संकपाल, रुपाली मुंदडा, आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
What's Your Reaction?