अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी चुलीवर स्वयंपाक, एनएसयुआय अक्रामक...
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी चुलीवर स्वयंपाक, एनएसयुआय अक्रामक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) - इज्राईल व इराण युद्ध सुरू असल्याने स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि दुसरीकडे सरकारच्या वतीने गॅसची टंचाई नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात हाॅस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी गॅस सिलिंडर पुरवठा होत नसल्याने चुलीवर स्वयंपाक बनवले जात असल्याचे एनएसयुआयच्या पाहणीत आल्याने खळबळ उडाली. यामुळे एनएसयुआय अक्रामक झाली आहे. तात्काळ एन एस यु आयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ शादाब शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आश्वासन दिले लवकरच हि समस्या सोडवली जाईल.
उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाला NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मेस संदर्भातील समस्यांची पाहणी केली. NSUI महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. शेख शादाब अब्दुल रहमान, राज्य सचिव सुमेध गायकवाड, औरंगाबाद सीएसएन जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील तसेच NSUI चे इतर पदाधिकारी या भेटीत सहभागी झाले होते.
या भेटीदरम्यान वसतिगृहातील मेसमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सध्या पारंपरिक चुलींवर स्वयंपाक केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्वयंपाक तयार होण्यासाठी अधिक वेळ लागत असून विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रश्न तात्काळ आणून देण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले असून मेसमध्ये गॅस सिलेंडरची व्यवस्था तातडीने करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे स्वयंपाक प्रक्रिया पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी NSUI नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त
केला.
What's Your Reaction?