उद्या 24 जूलै रोजी काॅकरोच जनता पार्टीचे देशव्यापी आंदोलन...!

 0
उद्या 24 जूलै रोजी काॅकरोच जनता पार्टीचे देशव्यापी आंदोलन...!

उद्या काॅकरोच पार्टीचे देशव्यापी आंदोलन... विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि.23(डि-24 न्यूज)- नीट युजीसी पेपरफुटी आणि देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारला जावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून राजधानी नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. काॅकरोच जनता पक्षाचे 20 जुलैच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्या विरोधात उद्या 24 जुलै 2026 रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

 उद्या देशभरात होणारे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, संपूर्ण देशभरात एकाच वेळी आंदोलन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांनी या सगळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीने केले आहे. या आंदोलनासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. सर्व जण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी सीजेपीकडून करण्यात आलेल्या 4 मागण्या सर्वांना वाचून दाखवाव्यात असे सांगण्यात आले आहे. 

आंदोलनस्थळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा द्याव्यात, असे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे. सीजेपीने चार प्रमुख मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सीजेपी केलेली आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवास्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसने देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आला. काँग्रेसकडून छात्रों की गुंज याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून 26 जुलैला संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे उद्या सायंकाळी 5 वाजता राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये केली जाईल, असे म्हटले आहे. यावर राहुल गांधी, सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे सलग चौथ्या दिवशी संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज होऊ शकले नाही. उद्या देशभरात होणा-या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow